TRENDING:

UPSC Exam मध्ये कॉपी करताना पकडलं तर काय होईल? देशातील कठीण परीक्षेचे नियम देखील कठोर आहेत का?

Last Updated:

अनेकांच्या मनात असा ही प्रश्न उपस्थीत होतो की समजा या परीक्षेला कोणी कॉपी केलीच आणि त्यांना कोणी पकडलंच तर अशा विद्यार्थांना काय शिक्षा होऊ शकते?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षांपैकी एक म्हणजे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा. देशात IAS, IPS, IFS सारख्या उच्च पदांवर पोहोचण्यासाठी हीच मुख्य वाट मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. परीक्षेला देशातील सर्वात कठोर परीक्षा मानलं जातं. त्यामुळे तिचे नियम देखील तेवढेच कठीण आहेत, जेणे करुन कोणीही कॉपी करु शकणार नाही. मॉडर्न तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रक्रियेसाठी UPSC ओळखला जातो. तरीही काही उमेदवार शॉर्टकट वापरून नकल करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांचं करिअर उद्ध्वस्त होतं.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

पण अनेकांच्या मनात असा ही प्रश्न उपस्थीत होतो की समजा या परीक्षेला कोणी कॉपी केलीच आणि त्यांना कोणी पकडलंच तर अशा विद्यार्थांना काय शिक्षा होऊ शकते?

UPSC परीक्षेत कॉ़पी करताना पकडले गेले तर परीक्षा केंद्रातून तात्काळ बाहेर काढलं जातं, पुढील परीक्षा देण्यावर बंदी येते आणि अनेक वेळा थेट पोलिस केस दाखल होतो. अलीकडच्या काळात UPSC ने कॉपी रोखण्यासाठी हायटेक जॅमर, CCTV निगरानी, बायोमेट्रिक ओळख अशा कडक सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. तरीही काही उमेदवार ब्लूटूथ डिव्हाईस, इलेक्ट्रॉनिक चिप, खोटे आयडी यांचा वापर करून नियम मोडतात.

advertisement

BNS 2023 अंतर्गत कॉपी ही गंभीर गुन्हा

Bharatiya Nyaya Sanhita (BNS) 2023 नुसार UPSC परीक्षेत नकल, फर्जी कागदपत्रं किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर हा गुन्हा मानला जातो. जर उमेदवार ब्लूटूथ डिव्हाईस, मायक्रो इयरफोन किंवा खोट्या आयडीसह पकडला गेला, तर BNS कलम 316 (फसवणूक), कलम 317 (जालसाजी) लागू होतात. जर या प्रकरणात एखादा टोळी किंवा एजंट सामील असेल, तर कलम 109 (साजिश) आणि कलम 71 ही लागू होऊ शकतात.

advertisement

शिक्षा किती कठोर असते?

BNS च्या कलम 316 अंतर्गत दोषी ठरल्यास जास्तीत जास्त 7 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. फर्जी दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक पुरावे आढळल्यास शिक्षा अधिक कडक होऊ शकते. अलीकडे UPSC Combined Medical Services Exam दरम्यान एका उमेदवाराला कॉपी करताना पकडल्याने 3 वर्षांसाठी परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली होती.

advertisement

2024 च्या UPSC प्रीलिम्स दरम्यान राजस्थानच्या अजमेरमध्ये एका उमेदवाराला ब्लूटूथ डिव्हाईस आणि मायक्रो इयरफोनसह कॉपी करताना पकडलं गेलं. संशयास्पद वर्तन पाहून फ्लाइंग स्क्वॉडने त्याची तपासणी केली असता कानात मायक्रो इयरफोन आणि कमरेला सिम कार्ड असलेलं डिव्हाईस सापडलं. त्यानंतर त्याला पोलिसांनी तात्काळ अटक करून फसवणुकीची केस दाखल केली आणि UPSC ने त्याला परीक्षा केंद्रातून ताबडतोब बाहेर काढलं.

advertisement

अनेक प्रकरणांमध्ये कोर्टाने कॉपी करणाऱ्या उमेदवारांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. जर संघटित टोळीचा सहभाग आढळला तर Organized Crime Act अंतर्गतही कारवाई होऊ शकते. याशिवाय भविष्यातील सरकारी नोकऱ्यांसाठी कायमचं डिबार होण्याची शक्यता असते. कॉपी हा केवळ परीक्षा नियमभंग नाही तर नैतिक गुन्हा मानला जातो. प्रशासनिक पदांवर बसणाऱ्या अधिकाऱ्यांकडून प्रामाणिकपणा अपेक्षित असल्याने UPSC कठोर कारवाई करून योग्य संदेश देते.

मराठी बातम्या/Viral/
UPSC Exam मध्ये कॉपी करताना पकडलं तर काय होईल? देशातील कठीण परीक्षेचे नियम देखील कठोर आहेत का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल