सावंतवाडीच्या रोनापाल-सोनुर्ली जंगलात ही अमेरिकन महिला साखळीनं बांधलेल्या अवस्थेत सापडली. आठवडाभर या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला. या तपासात धक्कादायक सत्य समोर आले आहेत. त्या महिलेने दिलेला जबाब आणि त्यानुसार आणि त्याच दिशेने पोलिसांनी केलेल्या अतिशीघ्र तपासामध्ये अनेक विसंगती आढळून आल्या.
मुंबई, दिल्ली, गोव्यात महिलेचं वास्तव्य
या महिलेने गोवा इथं काही हॉटेलवर वास्तव्य केलं. तसंच मुंबई, दिल्ली इथं तिचं वास्तव्य आढळून आले. दिल्लीमध्ये तिच्या नावावर एक वाहन आहे. तिने महिनाभरापूर्वी विरार येथील दुकानातून टेंट विकत घेतला. तो विकत घेतानादेखील ती एकटीच गेली होती, हे येथील सीसीफुटेजवरून आढळून आलं. गोवा येथील वास्तव्यातही तिचा एकटीचाच वावर आढळून आला. यावरून तिच्यासोबत कुणीच नसल्याचे निदर्शनास येत आहे.
advertisement
OMG! 30 वर्षांत एकदाही झोपली नाही महिला, 24 तास उघडे असतात डोळे
महिलेनं दिलेल्या पत्त्यावर तिचा नवरा नाही
महिलेने नवरा म्हणून ज्या व्यक्तीचं नाव दिलं, त्या नावाच्या व्यक्तीचं अस्तित्व कुठेच आढळून आलं नाही. एवढंच नव्हे, तर तिने तामिळनाडूच्या आपल्या निवासस्थानाचा जो परमनंट अॅड्रेस दिला होता, त्या अॅड्रेसवर निवासस्थान नसून एक दुकान असल्याचं आढळून आलं. हिलेजवळील मोबाईल आणि टॅबवर आढळलेल्या माहितीनुसार त्या महिलेचा मुंबई आणि गोवा येथील आतापर्यंत जो वावर आढळून आला, तिथं ती एकटीच आढळून आली आहे.
महिला जंगलात पोहोचली कशी?
सदर महिला मड्डुरा रेल्वे स्टेशनवर उतरून तिथून ती सदर जंगलात पोहोचली असेल, असा प्राथमिक अंदाज होता. पण महुरा रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या फुटेजमध्ये ती महिला कुठेच आढळून आली नाही. कदाचित स्टेशन येण्यापूर्वी, स्टेशननजीकच ट्रेन बऱ्याचवेळा सिग्नलसाठी स्लो होते किंवा काही मिनिटांकरीता बांबते. ती ज्या ठिकाणी थांबते, त्या ठिकाणापासून तो जंगलाचा भाग अगदी 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे सदर महिला मानसिक स्वास्थ्य गमावलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी उतरून जंगलाच्या दिशेने गेली असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.
महिलेला साखदंडात कुणी बांधलं?
ही महिला सदर जंगलात साखळदंडाने जखडलेल्या अवस्थेत आढळून आली, असं म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात तो साखळदंड नसून ती एक छोटीशी साखळी होती. जिच्यामध्ये सदर महिलेचा एक पाय बांधून त्याला छोटसं कुलूप लावण्यात आलं होतं व त्या साखळीचं दुसरं टोक झाडाला बांधून ठेवण्यात आलं होतं. जर सदर महिलेला कायमचं संपवून टाकण्याच्या उद्देश तिच्या नवऱ्याचा वा अन्य कुणाचा असता, तर त्याने एवढी छोटी साखळी आणि ती एकाच पायाला बांधून सदर महिलेचे हात व एक पाय मोकळा सोडला नसता.
हिंमत करून पिरॅमिडमध्ये गेली व्यक्ती; आत जाताच जे दिसलं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल
महिलेजवळ रेनकोट आणि पैसे
एवढंच नव्हे तर त्या महिलेला कायमचं संपवून टाकण्याचा उद्देश असता, तर ती पावसात भिजेल म्हणून तिला रेनकोट घालू दिला नसता. त्याचबरोबर त्या महिलेकडे तिचा मोबाईल कदापिही ठेवला नसता. तसंच जाताना सदर महिलेजवळील 31 हजार रुपयांची रोख रक्कम कोणी तशीच ठेवून गेला नसता.
महिलेजवळ खाण्याच्याही वस्तू
या महिलेने आपल्या प्राथमिक जबाबात नवऱ्याने आपल्याला 20 दिवस अन्न दिलं नाही, असा दावा केला आहे. प्रत्यक्षात या महिलेला घटनास्थळावरून ताब्यात घेताना तिच्याजवळ खाद्यपदार्थांचा डब्बा, बिस्किटे, पाण्याची बॉटल आणि काही खाद्यपदार्थ आढळून आलं. याचाच अर्थ असा निघतो की, ही महिला उपाशी नव्हती. तिच्यासोबत खाद्यपदार्थांची व्यवस्थित सामुग्री होती.
तिने हे असं का केलं असावं?
सदर महिलेला मानसिक आजार आहे. सदर महिला ज्या मानसिक आजाराने पीडित आहे, तो आजार सिजोफ्रेनिया या प्रकारातील असल्याचं समजतं. मानसोपचार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या आजाराचे अनेक प्रकार असतात. यामध्ये पीडित व्यक्ती तहान-भूक विसरून आपल्याच काल्पनिक विश्वात वावरत असते. ती सामान्य माणसासारखी जरी दिसत असली, तरी त्या व्यक्तीचं एक काल्पनिक जग असते. त्यामध्ये त्या व्यक्तीचे कुटुंबीय, मित्र आणि सर्वकाही असतं. वास्तवात ते काहीच नसतं. या आजारात पीडित व्यक्ती स्वतःला फार मोठी इजा होणार नाही, याची काळजी घेऊन कल्पनेत आपण खूप वेदना सहन करीत आहोत, अशा मानसिक अवस्थेत असतात. सोनुर्लीच्या जंगलात सापडलेली ही महिला याच आजाराची शिकार झाली असल्याची दाट शक्यता दिसून येत आहे.
हा मानसिक आजार एवढा भयानक असतो की, आजुबाजूला काय चाललेलं आहे, याचं भान त्यांना राहत नाही. ही माणसं कितीही दिवस, कुठेही अन्न-पाण्याशिवाय राहू शकतात. एकंदर या महिलेच्या बाबतीत हाच प्रकार झाला असल्याची शक्यता प्रथमदर्शनी तरी दिसून येते तिच्या जबाबानुसार तिला बांधून ठेवणारा आणि तिचा छळ करणारा पती हा कदाचित कल्पनेतीलही असू शकतो. आतापर्यंतच्या पोलिसांच्या तपासावरून तरी तीच शक्यता जास्त वाटते.
आठवीच्या मुलीने वर्षभरापूर्वी सांगितलेली भयानक गोष्ट ठरली खरी; भारतात आलं मोठं संकट
वरील शक्यतेला पुष्टी देणारी सर्वात धक्कादायक बाब अशी की, काही महिन्यांपूर्वी तिच्यावर गोव्यातील बांबोळी येथील इस्पितळात तसंच अन्य काही इस्पितळांमध्ये मानसिक उपचार झाल्याचंदेखील उघडकीस आलं. तिच्याजवळ आढळलेल्या औषधोपचारांच्या कागदपत्रानुसार तपास केला असता जानेवारी महिन्याच्या दरम्यान तिने गोव्यात बांबोळी इस्पितळामध्ये मानसिक आजारावर उपचार करून घेतल्याचं आढळून आलं. त्यावेळी तिनं सदर इस्पितळामध्ये लिहून दिलेल्या जबाबामध्ये आपलं कुणीच नसल्याचं नमूद केलं आहे.
...तरच सत्य बाजू येऊ शकते प्रकाशात
या सर्व शक्यता वाटत असल्या, तरी सिंधुदुर्ग पोलिसांनी मात्र याबाबत ठोस असं काहीही स्पष्ट केलेलं नाही. या महिलेला आता अधिक उपचाराकरीता रत्नागिरी येथील शासकीय मनोरुग्णालयामध्ये उपचाराकरीता पाठवण्यात आलं आहे. या ठिकाणी ती महिला ज्यावेळी औषधोपचार घेऊन पूर्ववत मानसिक स्थितीत येईल, त्यावेळीच यावर स्पष्ट असा खुलासा होऊ शकतो. तोपर्यंत जर आणि तर वरच या प्रकरणाबाबत चर्चा राहणार आहे
