आठवीच्या मुलीने वर्षभरापूर्वी सांगितलेली भयानक गोष्ट ठरली खरी; भारतात आलं मोठं संकट
- Published by:Priya Lad
Last Updated:
आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीनं गेल्या वर्षी तिच्या शाळेच्या मासिकात एक गोष्ट लिहिली होती. जी गोष्ट तिच्या गावात खरी ठरली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे.
नवी दिल्ली : संकटं काही सांगून येत नाही. कधी, कुठे, काय, कसं घडेल माहिती नाही. बाबा वेंगा, नास्त्रेदमस यासारख्या लोकांनी कित्येक वर्षे आधी भविष्यवाणी सांगिल्यात त्यापैकी काही खऱ्याही ठरल्यात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल शाळेत शिकणारी एक मुलगी जिने वर्षभरापूर्वी शाळेत एक गोष्ट सांगितली होती. जी आता खरी ठरली. सर्वात मोठं संकट आलं.
लाया असं या मुलीचं नाव आहे. लाया आठवी इयत्तेत शिकतं. गेल्या वर्षी तिनं तिच्या शाळेच्या मासिकात एक गोष्ट लिहिली होती. तिच्याच वयाच्या मुलीची ही गोष्ट. तिच्या गोष्टीतील मुलगी गावाजवळच्या धबधब्याजवळ जाते. धबधब्यात पडते, ज्यात तिचा मृत्यू होतो. पण तीच मुलगी एक पक्षी बनून त्या गावात परत येते. गावातील लोकांना पुराच्या धोक्याबाबत सूचना देते. गावातील मुलांना भेटते आणि इथून पळून जा. पुढे धोका आहे. असं ती सांगते. तिचं ऐकून मुलंही घाबरतात आणि पळत सुटतात. एका टेकडीजवळ जाऊन थांबतात.
advertisement
तिथं टेकडीवरून वेगानं वाहणारं पावसाचं पाणी पाहतात. त्याचवेळी तो पक्षी एका सुंदर मुलीत रुपांतरित होतो आणि काही क्षणात गायब होतो.
मुलीनं सांगितलेली गोष्ट ठरली खरी
लाया ही केरळच्या त्याच वायनाडमधील आहे, जिथं भूस्खलन झालं. शेकडो लोकांचा बळी गेला आहे. कित्येक जण जखमी झाले आहेत आणि अद्यापही काही बेपत्ता आहेत. लाया याच वायनाडमधील एका शाळेत आठवी इयत्तेत शिकते. तिनं शाळेच्या मासिकेत ज्या नैसर्गिक आपत्तीचा उल्लेख केला अगदी तसंच तिथं घडलं.
advertisement
लायाचं चूरामला हे गाव भूस्खलनानंतर भुईसपाट झालं आहे. या नैसर्गिक आपत्तीत तिच्या वडिलांचाही मृत्यू झाला. लायाच्या शाळेच्या अनेक खोल्या कोसळल्या आहेत. शाळेजवून वाहणाऱ्या नदीचं पाणी शाळेत शिरलं असून शाळेतील बरचसं साहित्य वाहून गेलं आहे. लायाच्या शाळेतील 32 मुलं दगावली आहेत. तर तिच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी त्यांचे आईवडील, भावंडं गमावली आहेत.
advertisement
'शाळेत असतो तर वाचलो नसतो'
लायाच्या शाळेचे मुख्याध्यापक व्ही. उन्नीकृष्णन यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं, 'आम्ही पाच शिक्षक चूरामला इथं भाड्याने राहतो. आमच्या घराच्या मागे एक उंच टेकडी आहे. आठवडाभरापूर्वी मुसळधार पाऊस पडत होता. भूस्खलनाच्या भीतीने आम्ही त्या दिवशी शाळेत थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र काही वेळाने आम्ही घरी परतलो. त्याच दिवशी नदीचं पाणी शाळेत शिरलं आणि शाळेजवळ भूस्खलन झालं. आम्ही तेव्हा शाळेत असतो तर वाचलो नसतो'
advertisement
Location :
Kerala
First Published :
August 02, 2024 1:42 PM IST
मराठी बातम्या/Viral/
आठवीच्या मुलीने वर्षभरापूर्वी सांगितलेली भयानक गोष्ट ठरली खरी; भारतात आलं मोठं संकट


