Shailesh Datar: कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्याच्या भूमिकेत शैलेश दातार, ‘केस नं. ७३’ मधील डॅशिंग अंदाज चर्चेत
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या शैलेश दातार यांचा लवकरच ‘केस नं. ७३’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केव्हाही न पाहिलेल्या भूमिकेत प्रेक्षकांना शैलेश दातार दिसणार आहेत.
मुंबई: मराठी सिनेमा, मालिका आणि हिंदी मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता शैलेश दातार पुन्हा एकदा त्यांच्या नव्या मालिकेमुळे चर्चेत आले आहेत. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या शैलेश दातार यांचा लवकरच एक नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केव्हाही न पाहिलेल्या भूमिकेत प्रेक्षकांना शैलेश दातार दिसणार आहेत. शैलेश दातार एका कर्तव्यदक्ष आणि जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून भेटीला येणार आहेत.
दरम्यान, शैलेश पोलीस अधिकाऱ्याची भूमिका मराठी चित्रपटामध्ये साकारणार आहेत. ‘केस नं. ७३’ असं या चित्रपटाचं नाव असून येत्या 6 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, शैलेश दातार ‘केस नं. ७३’ चित्रपटामध्ये एसपी संजय देशमुख ह्या जिगरबाज आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची निर्मिती लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओजच्या बॅनरखाली केली जाणार आहे. तर, ‘केस नं. ७३’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे असून यांच्यासोबत चित्रपटाचे निर्माते शर्वरी सतीश वटक सुद्धा आहेत. तर, सहनिर्माते प्रविण अरुण खंगार आहेत.
advertisement
चित्रपटाचे कथानक
शैलेश दातार पहिल्यांदाच एका आव्हानात्मक भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. ‘केस नं. ७३’ चित्रपटामध्ये एसपी म्हणून संजय देशमुख यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांच्या पूर्ण सेवाकाळात एकही गुन्हा आजवर अनसॉल्व्ह राहिलेला नाही. प्रामाणिकपणा, कर्तृत्व आणि सरळ स्वभावामुळे संजय गावात लोकप्रिय आहे. मात्र, ऐन निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांच्याकडे एक अत्यंत गुंतागुंतीचा खटला येतो. ही केस सोडवण्याचे प्रचंड दडपण त्यांच्यावर आहे. धागेदोरे मिळत नाहीत आणि प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी कसोटीचा ठरतो. धाडस, शिस्त आणि प्रामाणिकपणाचा प्रत्यय देणारी ही भूमिका कथानकाला वेगळी कलाटणी देणारी असणार आहे.
advertisement
शैलेश दातार यांनी आपल्या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. भूमिकेविषयी म्हणाले की, "जिगरबाज पोलीस अधिकार्याची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी खरोखरच आव्हानात्मक होतं. एका पाठोपाठ होणाऱ्या खूनांचा आणि त्यातल्या खूनांमधील गुन्हेगारांचा शोध घेताना निर्माण होणारं गूढ ‘केस नं. ७३’ चित्रपटात पहाता येणार आहे. चित्रपटातल्या कथेतलं सस्पेन्स प्रेक्षकांना खुर्चीसोबत खिळवून ठेवणारं आहे." चित्रपटामध्ये शैलेश दातार यांच्यासोबत अशोक शिंदे, राजसी भावे, नंदिता पाटकर, पियुष आपटे अशी दमदार कलाकार मंडळी दिसणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 6:57 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Shailesh Datar: कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्याच्या भूमिकेत शैलेश दातार, ‘केस नं. ७३’ मधील डॅशिंग अंदाज चर्चेत










