या व्हिडिओत एक तरुणी वारंवार एका झाडाला मिठी मारताना दिसते. पहिल्यांदा पाहणाऱ्यांना ती पर्यावरणप्रेमी असावी असं वाटतं, पण खरी गोष्ट कळल्यानंतर अनेकजण चकित झाले आहेत. कारण ही तरुणी झाडाचं रक्षण करत नव्हती तर तिचं विवाह त्या झाडाशी लावण्यात आलं होतं आणि तो झाड तिचा पहिला नवरा आहे, ज्याच्यासोबत ती फोटो काढत आहे.
advertisement
सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या व्हिडिओतील मुलीचं नाव सिमरन चुग आहे. व्हिडिओ शेअर करताना सिमरनने लिहिलंय “हे माझ्या चांगल्या कर्मांचं फळ आहे”. व्हिडिओमध्ये तिने लिहिलंय की, “पहिल्या नवऱ्यासोबत प्री-वेडिंग फोटोशूट, कारण मी मागंलिक आहे”.
व्हिडिओत सिमरनने लाल ओढणी घेतली आहे आणि व्हिडीओत बॅकग्राउंडला शाहिद कपूरच्या ‘विवाह’ चित्रपटातील “दो अंजाने अजनबी” हे गाणं वाजतंय. व्हिडीओत तरुणी झाडाभोवती कधी लाजत, कधी हसते, कधी हाताने हार्ट बनवून फोटो काढते. तर कधी त्याला मीठी मारुन फोटो काढते. अगदी प्री-वेडिंग फोटोशूटसारखीच मजा ती घेताना दिसते. हा व्हिडिओ पाहून लोक हसतही आहेत आणि या विचित्र प्रथेबद्दल आश्चर्यही व्यक्त करत आहेत.
सध्या हा व्हिडिओ लाखोवेळा पाहिला गेला आहे, 2 लाखांपेक्षा जास्त लोकांनी त्याला लाईक देखील केलं आहे आणि जवळपास 5 हजार कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी स्वतःचे अनुभवही शेअर केले आहेत.
झाड किंवा प्राण्याशी लग्न का केलं जातं?
अनेकांना प्रश्न पडतो की मुलीचं झाड किंवा प्राण्याशी लग्न का लावलं जातं? ज्योतिषशास्त्रानुसार काही व्यक्तींमध्ये मांगलिक दोष असतो ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अडथळे येऊ शकतात असं मानलं जातं. हा दोष कमी करण्यासाठी मुलीचं आधी झाडाशी लग्न लावलं जातं, ज्याला “वृक्ष विवाह” म्हणतात.
या प्रक्रियेनंतर ती “विधवा” मानली जाते आणि नंतर तिचं पारंपरिक विवाहसोहळा सुरक्षितपणे होऊ शकतो असं ज्योतिष मानतात. काही वेळा मुलींचं लग्न प्राण्यांशीही लावलं जातं, यामागेही हेच कारण असतं.