लग्नाची पहिली रात्र म्हणून नवरा-नवरी एका खोलीत फुलांनी सजवलेल्या बेडवर होते. नवरा झोपला आहे आणि नवरी त्याच्या शेजारीच बसली आहे. पण ती असं काही करते की नवराही पाहत राहतो. नवरीचं कृत्य पाहून सगळेच शॉक झाले आहेत. आता ही नवरी असं नेमकं करते कायं? ते जाणून घेण्याची उत्सुकता असेल.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, लग्नाचा बेड सजवला आहे. त्यावर नवरदेव झोपला आहे. त्याचे फक्त पायच दिसत आहेत. त्याच्या बाजूला पायाजवळ नवरी बसली आहे. जिने आपल्या डोक्यावरील घुंघट किंवा दागिने वगैरे काहीही काढलेलं नाही आणि ती नवऱ्याचे पाय दाबते आहेत.
हा व्हिडिओ अर्शद खानने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये अर्शदने लिहिलं आहे की माझी पत्नी, ज्यावरून हे दिसून येते की हा व्हिडिओ अर्शदचा आहे.
सुहागरातसाठी आसुसलेली, पण नवऱ्याने नको तेच केलं, नवरीने सगळं सगळं सांगितलं, काय घडलं?
हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काहींनी म्हटलं, देवाने सर्वांना अशी काळजी घेणारी पत्नी द्यावी, तर काहींनी लाज वाटली पाहिजे, तू लग्नाच्या दिवशीच तिला कामाला लावलंस, असं म्हणत अर्शदवर टीका केली आहे. तर दुसऱ्याने म्हटलं आधी त्याने स्वतः पाय दाबले असतील, नंतर जेव्हा पत्नी दाबू लागली तेव्हा तो व्हिडिओ बनवून ते दाखवत आहे. तर आणखी एका युझरनेम्हटलं आता मला कळलं की मुलगी पाठवणीच्या वेळी इतकी का रडते. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.