अलीकडेच नायजेरियातील एडो जमातीचा कन्यादान विधी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात कन्यादानाची पद्धत दाखवण्यात आली. कन्यादानाचा हा विधी पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. यामध्ये मुलगी सात वेळा सासरच्या मांडीवर बसते. प्रत्येक वेळी एक वेगळं वचन घेतलं जातं.
Wedding Tradition : पान-सुपारी खाणं वाईट म्हणतात मग लग्नात नवरा-नवरीच्या तोंडात विडा का देतात?
advertisement
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे, जिथं लाखो युझर्स याची तुलना स्वतःच्या संस्कृतीशी करत आहेत. शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये वधूला सासरच्या मांडीवर कसं बसवलं जातं हे स्पष्टपणे दिसून येतं. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, मुलीचे वडील प्रथम तिला आपल्या मांडीवर बसवतात आणि नंतर तिला उचलतात.
नायजेरियाच्या आग्नेय भागात स्थायिक झालेली एडो जमात तिच्या समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. बेनिन शहर हे त्यांचं जन्मस्थान आहे, जिथं बेनिन राज्याचे वंशज राहतात. एडो विवाह नावाच्या पारंपारिक लग्नात अनेक टप्पे असतात. प्रथम इवबुओमो किंवा वधू शोधणं हा टप्पा असतो, जिथं वराचं कुटुंब ओळखीसाठी वधूच्या घरी जातं. त्यानंतर मुख्य समारंभ येतो, जिथं बनावट वधू हा खेळ खेळला जातो. वधूच्या कुटुंबातील एक वृद्ध महिला वराला अनेक मुली सादर करते आणि वराला त्याची खरी वधू ओळखावी लागते.
Honeymoon Hotel : हॉटेलचे 4 डर्टी सीक्रेट्स! हनीमूनला गेलेल्या प्रत्येक कपलला माहिती हवेच
हे झालं की वधूची किंमत दिली जाते - एक अतिशय माफक रक्कम 15-1500 नायरा म्हणजे अंदाजे 1,100 रुपये कारण एडो संस्कृतीत मुलांना मौल्यवान मानलं जातं, पैशांना नाही. त्यानंतर एक विशेष विधी केला जातो ज्यामध्ये वधू तिच्या पतीची बनते. या विधीमध्ये वधू तिच्या सासऱ्याच्या किंवा वडिलांच्या मांडीवर सात वेळा बसते. प्रत्येक वेळेचा वेगळा अर्थ असतो. पण आता बहुतेक वधू या विधी दरम्यान त्यांच्या पतीच्या मांडीवर बसतात. विधीचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
