व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरा-नवरी एकत्र बसले आहेत. लग्नाच्या विधी सुरू आहत. त्याचवेळी एक तरुण नवरदेवाजवळ येतो आणि त्याच्या हातात फ्रुटी देतो. नवरदेव फ्रुटी पितो आणि नंतर तो प्यायला नकार देतो. कारण त्या फ्रुटीमध्ये दारू मिसळलेली होती. नवरदेवाला फ्रुटीत दारू मिसळल्याचं कळतं आणि तो प्यायला नकार देतो.
सिंगल असलेल्या कर्मचाऱ्यांची झोप उडाली; कंपनीचा अजब फतवा, जूनपर्यंत वेळ आहे, लग्न करा नाही तर...
advertisement
व्हिडीओमध्ये नवरदेवाचे मित्र फ्रुटीत इंजेक्शन मिसळतानाही दिसत आहेत. @_abirbiswas94 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आळा आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेक युझर्स नवरदेवाच्या मित्रांचं कृत्य पाहून भडकले आहेत. त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युझरने म्हटलं आहे, असं कुणासोबत करू नका, एकाने म्हटलं लग्न म्हणजे काही मजा नाही, आणखी एका युझरने म्हटलं असे मित्र असतील तर शत्रूंची गरज काय आणि एका युझरनं म्हटलं अशा मूर्खांमुळेच लग्न मोडतात.