आम्ही फ्रान्सच्या परंपरेबद्दल बोलत आहोत. फ्रान्समध्ये Ortolan bunting नावाचा पक्षी आहे, ज्याच्यापासून बनलेली डिश लोक तोंड लपवून खातात. त्याला ‘पाप की थाली’ म्हणतात. असं मानलं जातं की लोक आपलं पाप देवापासून लपवण्याच्या उद्देशाने रुमालाने चेहरा झाकून हा पदार्थ खातात. ती एक परंपरा आहे. मात्र, आता या पक्ष्याचे मांस खाण्यावर युरोपातील अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. खुद्द फ्रान्सनेही त्यावर बंदी घातली आहे. पण तरीही अनेक ठिकाणी ते परंपरेच्या नावाखाली खाल्लं जातं.
advertisement
आधी नदीसारखंच गोडं होतं समुद्राचं पाणी; एका शापामुळे झालं खारट
तुम्ही विचार करत असाल की लोक याला 'पाप की थाली' का म्हणतात? तर यामागे एक कथा आहे. हे पक्षी दर शरद ऋतूत आफ्रिकेत स्थलांतर करतात. तेव्हाच शिकारी त्यांना पकडतात. त्यांच्यावर खूप अत्याचार केले जातात. शिकारी त्यांना अनेक आठवडे पेटीत कैद करून ठेवतात. ते आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न खातात ज्यामुळे त्यांचं वजन जास्त होतं. मग ते फुग्यासारखे फुगतात. नंतर ते आगीत भाजले जातात. अशी परंपरा आहे, की हा पूर्ण पक्षी एकाच वेळी खावा. जे याचं मांस खातात तेही ते क्रूरपणे खातात. यामुळेच कोणी पाहू नये म्हणून ते चेहरा लपवून खाण्याची परंपरा आहे.
अनेक दशकांपूर्वी ही डिश उत्तर युरोपमधील श्रीमंत घरांच्या जेवणाच्या टेबलची शान असायची. रोमन सम्राटांपासून ते फ्रेंच राजांपर्यंत, ते शाही टेबलांवर सजवलं जायचं. राजघराण्यातील लोक हे पक्षी खाणं अभिमानाचे प्रतीक मानत. हे इतकं अनन्य होतं की ते परंपरेनं केवळ श्रीमंत आणि पादरी लोकांसाठीच उपलब्ध होतं. ऑर्टोलन लहान, तपकिरी आणि फिंचसारखे असतात. त्यांचं डोके हिरवट-तपकिरी असतं आणि त्यांचं शरीर चिमणीसारखं दिसतं. लांबी अंदाजे सहा इंच असते. पण त्यांच्यासोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जातात.