आधी नदीसारखंच गोडं होतं समुद्राचं पाणी; एका शापामुळे झालं खारट
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
समुद्राच्या पाण्याच्या खारेपणाचं रहस्य पौराणिक कथेत दडलेलं आहे.
नवी दिल्ली, 06 डिसेंबर : समुद्राचं पाणी खारट असतं, हे आपल्याला माहिती आहे. ते खारट का असतं तर त्यात क्षार किंवा मीठ असतं, हे कुणीही सांगेल. पण त्यामागे एक पौराणिक कथाही सांगितली जाते. समुद्राच्या पाण्याच्या खारेपणाचं रहस्य या पौराणिक कथेत दडलेलं आहे. आधी समुद्राचं पाणी नदीसारखंच गोडं होतं. पण एका शापामुळे ते खारट झाल्याचं सांगितलं जातं. त्याविषयी जाणून घेऊया.
समुद्राचं पाणी खारं होण्यासाठी समुद्रमंथनाव्यतिरिक्त आणखीही काही रहस्य आहे. पौराणिक कथांमधल्या वर्णनानुसार, पूर्वी समुद्राचं पाणी दुधासारखं पांढरं आणि गोड होतं. सध्याच्या काळात मात्र समुद्राच्या पाण्याचं ते स्वरूप राहिलेलं नाही. समुद्राचं पाणी खारट आहे. त्यामुळे ते पिण्यायोग्य राहिलेलं नाही.
शिव महापुराणातल्या कथेनुसार, भगवान शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी हिमालयाची मुलगी पार्वतीने कठोर तपस्या केली होती. तिच्या तपोतेजामुळे तिन्ही लोक भयभीत झाले. देव यावर उपाय शोधू लागले, तेव्हा समुद्रदेव पार्वतीमातेवर लुब्ध झाले आणि त्यांनी पार्वतीमातेकडे विवाहाची इच्छा व्यक्त केली. पार्वतीमातेचं तप पूर्ण झाल्यावर जेव्हा समुद्रदेवांनी तिच्याकडे ही इच्छा व्यक्त केली, तेव्हा तिने समुद्रदेवांच्या भावनेचा मान राखून सन्मानपूर्वक सांगितलं, की 'मी पहिल्यापासूनच भगवान शिवशंकरांवर प्रेम करते.'
advertisement
हे ऐकल्यावर समुद्रदेव क्रुद्ध झाले आणि ते भगवान शिवशंकरांबद्दल वाईटसाईट बोलू लागले. समुद्रदेव पार्वतीला म्हणाले, की 'एका भस्मधारी आदिवासीकडे असं काय आहे, जे माझ्याकडे नाहीये. मी सर्व मनुष्यप्राण्यांची तहान भागवतो. माझं चरित्र दुधाप्रमाणे स्वच्छ आहे. त्यामुळे माझ्याशी विवाह करायला तयार हो आणि समुद्राची राणी बन.'
advertisement
समुद्रदेवाने महादेव शंकरांचा अपमान केला, ते पार्वतीला सहन झालं नाही. ती समुद्रदेवावर रागावली. त्यातच तिने समुद्रदेवाला शाप दिला. 'ज्या गोड्या पाण्याचा तुला गर्व आहे, ते पाणी खारट होईल. समुद्राचं पाणी कोणीच मनुष्य पिणार नाही,' असा शाप पार्वतीने दिला. तेव्हापासून समुद्राचं पाणी खारट झालं, असं म्हटलं जातं.
advertisement
'टीव्ही नाइन हिंदी'वर ज्योतिषाचार्य पंडित नारायण हरी शुक्ला यांनी ही माहिती दिली आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
December 06, 2023 11:29 PM IST


