हा व्हिडीओ एका फ्युजन आणि वेगळ्याच रंगाच्या डोसाचा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती डोसा बनवताना त्यात अशा गोष्टींचा वापर करते की बस्स.... ते पाहूनच त्याची चव नक्की कशी लागेल असा प्रश्न फुड्स लव्हर्सच्या मनात येईल.
व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती छत्तीसगडमधील रायपूर येथील आहे. जिथे एका व्यक्तीने ब्लू ओशन डोसा सादर केला आहे.
advertisement
तुम्ही पनीर डोसा, साधा डोसा तसेच मैसूर डोसा खाल्ला आहे. पण व्हायरल होत असलेल्या या डोसाने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे, त्यामुळे फूड लव्हर्स आणि ब्लॉगर्समध्ये एक नवीन वाद पाहायला मिळत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून काही लोकांनी शेफच्या क्रिएटिव्हिटीचे कौतुक केले, तर काही लोक डिशसोबत केलेली छेडछाड चुकीची असल्याचे सांगत आहेत. ओशन डोसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की, शेफ कसा तव्यावर निळ्या रंगाचा पिठ टाकतो, त्यावर मेयोनीज, चीज आणि सॉससोबत अनेक पदार्थ टाकतो आणि डोसावर पसरतो.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ @shashiiyengar नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. हे पाहून एका यूजरने कमेंट केली. त्यावर मेयोनीजचा तडका आहे, का? दुसर्या युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे - 'हे खूप चांगले दिसते. मला वाटायचे की लोक डोसे खातात कारण त्यांना ते आवडते, मग लोकांना या निळ्या रंगाच्या प्रोत्साहनाची काय गरज आहे.' तुम्हाला हा डोसा खायला आवडेल का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.