शी द पीपल वेबसाइटच्या अहवालानुसार, गुजरातमधील सुरखेडा, सनादा आणि अंबाल गावांमध्ये राहणाऱ्या आदिवासी लोकांमध्ये विवाहाची एक अतिशय अनोखी परंपरा पाळली जाते. या गावांतील विवाहांमध्ये वराला उपस्थित राहण्याची गरज नाही. तर, वराची अविवाहित बहीण किंवा कुटुंबातील कोणतीही अविवाहित स्त्री हा विवाह पार पाडते.
Weird Tradition - भारतातील या गावात 5 दिवस कपडे घालत नाहीत महिला; तेव्हा पुरुष करतात 'हे' काम
advertisement
हे आहे कारण -
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की अशा विश्वासामागे काय कारण आहे? खरं तर या तीन गावांचे एक कुलदेवता होते आणि ते अविवाहित होते. त्यांना आदर देण्यासाठी लग्नाच्या वेळी नवरदेवाला घरी ठेवलं जातं. कुलदेवताचा शाप वरावर पडू नये म्हणून हे केलं जातं. मुलगा नवरदेवाची वेषभूषा करतो. तो शेरवानी, पगडी घालतो, त्याची पारंपारिक तलवार हातात घेतो पण आपल्याच लग्नाला जात नाही.
नवरदेवाची बहीणच सगळे विधी पार पाडते (फोटो: Twitter/@DESIblitz)
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, एका गावकऱ्याने यावर भाष्य करताना सांगितलं की, नवरदेव त्याच्या आईसोबत घरीच असतो आणि नवरदेवाची बहीण लग्नाची मिरवणूक घेऊन जाते. लग्न झाल्यावर बहीण वधूला घरी आणते. वराने करायचे सगळे विधी त्याची बहीण करते, मग ते मंगळसूत्र घालणं असो किंवा सात फेरे घेणं असो. ही परंपरा कोणी पाळली नाही तर त्यांचं काहीतरी वाईट होईल, असा समज या गावात आहे. लोक मानतात, की एखाद्याने परंपरा पाळली नाही तर लग्न लवकर तुटतं किंवा वैवाहिक जीवनात इतर अनेक समस्या निर्माण होतात.