Weird Tradition - भारतातील या गावात 5 दिवस कपडे घालत नाहीत महिला; तेव्हा पुरुष करतात 'हे' काम

Last Updated:

ही परंपरा कित्येक वर्षांपासून आहे. यामागे कारणही आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली, 05 डिसेंबर :  जगात अशी काही पर्यटनस्थळं आहेत जिथं कपड्यांशिवाय फिरण्याची परवानगी आहे. भारतातही असं एक ठिकाण आहे. पण हे पर्यटनस्थळ नाही तर गाव आहे. जिथं महिला 5 दिवस कपडे घालत नाहीत. जेव्हा महिला कपडे घालत नाही तेव्हा पुरुषांनाही काही काम दिलं जातं. ही परंपरा कित्येक वर्षांपासून आहे. यामागे कारणही आहे.
हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण खोऱ्यातील पिणी गावाची ही परंपरा. परंपरेनुसार, वर्षातील 5 दिवस असे असतात जेव्हा स्त्रिया कोणतेही कपडे घालत नाहीत. श्रावण महिन्यातील ते 5 दिवस  असतात. आता या विशेष 5 दिवसांत बहुतांश महिला घराबाहेर पडत नाहीत. पण, काही स्त्रिया आजही ही परंपरा स्वतःच्या इच्छेने पाळतात. असं म्हणतात की, जी स्त्री ही परंपरा पाळत नाही तिला काही दिवसातच वाईट बातमी ऐकायला मिळते.
advertisement
असे म्हटले जाते की, पिणी गावात फार पूर्वी राक्षसांची दहशत होती. यानंतर 'लहुआ घोंड' नावाची देवता पिणी गावात आली. देवतेने राक्षसाचा वध करून पिणी गावाला राक्षसांच्या दहशतीपासून वाचवलं. तसेच हे सर्व राक्षस गावातील विवाहित महिलांना सुंदर कपडे घालत असत. देवतांनी असुरांचा वध करून स्त्रियांना यापासून वाचवले. तेव्हापासून देव आणि दानवांमध्ये 5 दिवस महिलांचे कपडे न घालण्याची परंपरा सुरू आहे. जर स्त्रिया कपड्यांमध्ये सुंदर दिसल्या तर आजही राक्षस त्यांना उचलून घेऊन जाऊ शकतात, अशी मान्यता याठिकाणी आहे.
advertisement
त्याच वेळी, या गावात पुरुषांसाठी देखील एक कठोर परंपरा आहे, जी त्यांना पाळणे अनिवार्य आहे. या 5 दिवसात त्यांना दारूचे सेवन करण्यास मनाई असते. श्रावणातील या पाच दिवसांत मद्य आणि मांसाहार न करण्याची परंपरा आहे. असे म्हटले जाते की, जर माणसाने परंपरा नीट पाळली नाही तर देवता कोपतात आणि त्याचे नुकसान करतात. या दोन परंपरांचे पालन करण्यामागेही एक रंजक कथा आहे, जी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
advertisement
या दरम्यान संपूर्ण गावात नवरा-बायको एकमेकांशी बोलतही नाहीत. या काळात पती-पत्नी एकमेकांपासून पूर्णपणे दूर राहतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Weird Tradition - भारतातील या गावात 5 दिवस कपडे घालत नाहीत महिला; तेव्हा पुरुष करतात 'हे' काम
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement