Weird - इथं महिलांच्या चेहऱ्यावर बनवले जातात खास टॅटू; आश्चर्यकारक कारण

Last Updated:

आजकाल टॅटू अनेक लोक काढतात पण या महिलांच्या चेहऱ्यावरील टॅटूचं कारण मात्र वेगळंच आहे.

फोटो - X/@Maximosis
फोटो - X/@Maximosis
नवी दिल्ली, 03 डिसेंबर : टॅटू काढण्याची प्रथा जगात नवीन नाही. मात्र, आजच्या काळात लोक आधुनिक होत असताना टॅटू काढण्याची कारणे आणि टॅटूचा लूकही बदलत आहे. शतकानुशतके टॅटू ही एक गरज होती, आज टॅटू हा लोकांचा छंद आणि स्टाईल स्टेटमेंट बनला आहे. पण एक असं ठिकाण जिथं महिलांच्या चेहऱ्यावर कित्येक वर्षांपासून टॅटू आहेत.  इथल्या महिलांनी टॅटू काढण्यामागचं कारण खूप आश्चर्यकारक आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा एका जमातीबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यासाठी टॅटू हे सुरक्षित राहण्याचे साधन होते. म्यानमारच्या या जमातीतील महिलांच्या चेहऱ्यावर टॅटू आहेत आणि त्यामागचे कारण असे आहे की तुम्हाला याबद्दल जाणून आश्चर्य वाटेल.
पश्चिम म्यानमारच्या चिन राज्यातील लाइ तू चिन जमातीच्या महिला जगभर प्रसिद्ध आहेत. कारण या महिलांच्या चेहऱ्यावर टॅटू आहेत. यात नवल ते काय असा प्रश्न तुम्हाला पडेल. आज भारतात आणि परदेशातील स्त्रिया फॅशनच्या निमित्ताने चेहऱ्यावर तसेच शरीराच्या इतर अवयवांवर टॅटू बनवतात. खरं तर, अनेक महिलांनी त्यांच्या संपूर्ण शरीरावर टॅटू बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. पण इथल्या महिलांच्या चेहऱ्यावरील टॅटूची कहाणी खूप आश्चर्यकारक आहे.
advertisement
चिन लोकांच्या समजुतीनुसार, एकदा एक बर्मी राजा या भागात आला होता. त्याला येथील महिला अतिशय आकर्षक वाटल्या. यामुळे त्याने एका महिलेला आपली राणी बनवण्यासाठी तिचं अपहरण केलं. या घटनेने चिन लोक घाबरले आणि त्यांनी आपल्या मुलींच्या चेहऱ्यावर गोंदवलं. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. आणखी एका मान्यतेनुसार, येथील महिलांच्या चेहऱ्यावर टॅटू बनवले गेले जेणेकरून त्या सुंदर आणि परिसरातील इतर जमातींपेक्षा वेगळ्या दिसाव्यात. यामुळे इतर जमातीचे लोक इतर या महिलांचं अपहरण करणार नाहीत, असा विश्वास त्यांना होता. तिसरी श्रद्धा धर्माशी संबंधित आहे. ब्रिटीश साम्राज्याच्या स्थापनेनंतर चिन अल्पसंख्याकांचे ख्रिश्चन धर्मात रूपांतर झालं. ज्यांच्या चेहऱ्यावर टॅटू आहेत अशा ख्रिश्चनांनाच स्वर्ग मिळेल, असं आश्वासन त्यांना देण्यात आले.
advertisement
1960 च्या दशकात बर्माच्या समाजवादी सरकारने चेहरा टॅटू अमानवी असल्याचं घोषित करून त्यावर बंदी घातली होती. त्यामुळे पूर्वीच्या काळातील महिलांच्या चेहऱ्यावर टॅटू दिसतात. सध्या या भागात टॅटू काढणारी वृद्ध पिढी ही शेवटची पिढी आहे. यानंतर ही प्रथा येथून पूर्णपणे नाहीशी होईल.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Weird - इथं महिलांच्या चेहऱ्यावर बनवले जातात खास टॅटू; आश्चर्यकारक कारण
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement