TRENDING:

भारतातल्या या राज्यात लग्नानंतर नवरा सासरी जातो; प्रेमातही तरुणी तरुणांना करतात प्रपोझ

Last Updated:

विवाहाचा विचार केला तर देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये विवाहानंतर नववधू सासरी येते; पण एका राज्यातल्या आदिवासी जमातीत नेमकी उलट परंपरा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळी संस्कृती आणि परंपरा पाहायला मिळते. तसंच राहणीमान, चालीरीतीदेखील वेगवेगळ्या असल्याचं दिसतं. काही राज्यांमध्ये विवाहविषयक परंपरादेखील वेगळ्या आहेत. ईशान्येकडच्या एका राज्यातल्या आदिवासी जमातीत तर विवाहाची परंपरा काहीशी निराळीच आहे. या जमातीत विवाहानंतर वराला आपलं घर सोडून पत्नीच्या घरी अर्थात सासरी जावं लागतं. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
advertisement

देशाच्या प्रत्येक राज्याची संस्कृती आणि परंपरा वेगळ्या आहेत. विवाहाचा विचार केला तर देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये विवाहानंतर नववधू सासरी येते; पण एका राज्यातल्या आदिवासी जमातीत नेमकी उलट परंपरा आहे. या राज्यात विवाहानंतर वराला आपलं घर सोडून वधूच्या घरी राहायला जावं लागतं.

कुठे आहे ही परंपरा?

ईशान्येकडच्या मेघालय राज्यातल्या खासी जमातीत ही परंपरा पाहायला मिळते. या जमातीत विवाहाबाबत वेगळे रीतीरिवाज आहेत. तिथे वंश वडील नाही तर आई चालवते. याचा अर्थ तिथली घरं मातृवंशीय व्यवस्थेवर चालतात. याचा अर्थ घरातली संपत्ती वडिलांकडून मुलाकडे न जाता आईकडून मुलीला प्राप्त होते. मुलं आईचं आडनाव लावतात. विवाहानंतर वर सासरी राहतो. या समाजात महिलांना खूप सन्मान दिला जातो. त्यांना पुरुषांच्या तुलनेत जास्त अधिकार मिळतात.

advertisement

कसा असतो लग्नसोहळा?

मेघालयात पारंपरिक विवाह गुंतागुंतीचा असतो. या राज्यातले तरुण आणि तरुणींचा विवाह हा दोघांच्या कुटुंबाच्या सहमतीनंतर होतो. काही प्रकरणात औपचारिक विवाहसोहळा नसतो. हा सोहळा नवऱ्या मुलाच्या घरी पडतो. त्या वेळी जोडपं एकमेकांना अंगठी देतं. मेघालयात विवाहाच्या बाबतीत सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे तिथे हुंड्याची प्रथा नाही. विवाहावेळी कपडे परिधान करण्याची स्टाइल युनिक असते. महिला पारंपारिक दागिने परिधान करतात. वराच्या वेशभूषेला स्थानिक भाषेत धारा किंवा जेनेज्म असं म्हटलं जातं.

advertisement

मेघालयात सगोत्र विवाहास परवानगी नाही. विवाह रीतीरिवाज आणि पारंपरिक पद्धतीने होतो. त्या वेळी तरुणी तरुणाला प्रपोझ करते. तरुण, तरुणींना आपला जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य असतं. ज्या व्यक्तींचा विवाह निश्चित होतो, त्यांनी साखरपुड्यापूर्वी एकमेकांना पूर्णपणे जाणून घेतलेलं असतं.

मराठी बातम्या/Viral/
भारतातल्या या राज्यात लग्नानंतर नवरा सासरी जातो; प्रेमातही तरुणी तरुणांना करतात प्रपोझ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल