नासाच्या अपोलो मोहिमेदरम्यान अंतराळवीरांनी चंद्राच्या पृष्ठभागावरून 382 किलो माती आणली. त्यात चंद्रावरील खडक, कोर नमुने, खडे, वाळू आणि धूळ समाविष्ट होती. फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांना एक रोप लावण्यासाठी फक्त 1 ग्रॅम माती देण्यात आली. संशोधकांनी या मातीत काही झाडं पेरली आणि या मातीत शेती करता येते का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पेरणीनंतर केवळ 2 दिवसांनी बियाणं उगवलं. हे पाहून संशोधकांना आश्चर्य वाटलं. सहसा यासासाठी 4-5 दिवस लागतात.
advertisement
भारतातील एकमेव नदी जिचं पाणी खारट; वाहता-वाहता अचानकच होते गायब, अजब आहे कारण
विद्यापीठाच्या प्राध्यापिका अॅना-लिसा पॉल यांनी यावर एक रिसर्च पेपर पब्लिश केला आहे. त्यांनी लिहिलं, आम्ही किती आश्चर्यचकित झालो, हे मी सांगू शकत नाही. 6 दिवस सर्व झाडं सारखीच दिसत होती. पण अचानक खूप काही बदललं. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, प्रोफेसर अॅना-लिसा पॉल म्हणाल्या - 6 दिवसांनंतर चंद्राच्या मातीत उगवलेली झाडं कमकुवत होऊ लागली. त्यांचा विकास थांबू लागला. एक वेळ आली जेव्हा सर्व झाडं नष्ट झाली. भविष्यात मानवांना तिथे राहायचं असल्यास कोणत्या प्रकारचं अन्न आवश्यक असेल हे यावरून ठरलं. तिथे शेती कशी होणार?