भारतातील एकमेव नदी जिचं पाणी खारट; वाहता-वाहता अचानकच होते गायब, अजब आहे कारण
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
भारतात एक अशी नदी आहे जी समुद्राला न मिळताच नाहीशी होते. या नदीचं पाणीही खारट आहे.
नवी दिल्ली 18 नोव्हेंबर : भारतात अनेक नद्या आहेत. याच्या पाण्यानेच लोकांची तहान भागते. जेव्हा नदीचं पाणी पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यात अपयशी ठरू लागलं, तेव्हा तलाव बांधले गेले. पूर्वी देखील अनेक नैसर्गिक तलाव होते. पण आता मानवाने अनेक सरोवरे आणि तलावही निर्माण केले आहेत. जर आपण नद्यांबद्दल बोललो तर भारतातील अनेक नद्या त्यांच्या उगमस्थानापासून उगम पावतात आणि नंतर वाहत जात शेवटी समुद्राला मिळतात.
या नद्या बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात मिळतात. पण भारतात एक अशी नदी आहे जी समुद्राला न मिळताच नाहीशी होते. नद्यांचे पाणी सहसा गोड असतं. अनेक समुद्री जीव त्यात राहतात. त्याच्या पाण्याने लोक आपली तहान भागवतात. पण समुद्राचं पाणी पिण्यायोग्य नसतं. हे पाणी खारट असतं. पण भारतात एक अशी नदीही आहे, जिचं पाणी कोणीही पिऊ शकत नाही. याचं कारण म्हणजे त्याचा खारटपणा. होय, भारतातील एकमेव नदी जिचं पाणी खारट आहे.
advertisement
तसंच, ही नदी विशेष आहे कारण याचं पाणी कोणत्याही समुद्रात जाऊन मिसळत नाही. ही अशी नेमकी कोणती नदी आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, ही लूनी नदी आहे. लूनी नदी खोल नाही. ती रुंद वाहते. नदी रुंद झाल्यावर तिचं पाणी लवकर वाफेत बदलतं.
advertisement
तसंच, लूनी नदी राजस्थानच्या त्या भागातून जाते जिथे उष्णता तीव्र असते. अशा स्थितीत तिथलं पाणी लवकर वाफेत बदलतं आणि ते नाहीसं होतं. थारच्या वाळवंटात गेल्यावर, लूनी नदी गुजरातमधील कच्छच्या रणात नाहीशी होते आणि कोणत्याही समुद्राला जाऊन मिळत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2023 8:49 AM IST