असाच एक शब्द म्हणजे "ट्रीट कल्चर" हा एक नवीन ट्रेंड झपाट्याने वाढताना दिसत आहे. पण ट्रीक कल्चर म्हणजे नक्की काय आणि त्याचा अर्थ काय? म्हणजे मित्रांसोबत जेवायला जाणं, कॉफी, बर्गर, पिझ्झा, किंवा छोट्या-छोट्या सेलिब्रेशनसाठी वारंवार "मी देते", "मी देतो" असं म्हणत पैसे खर्च करणं. पाहता पाहता हे छोट्या ट्रीट्सचं सत्र इतकं वाढतं की महिन्याच्या शेवटी पाकीट रिकामं झाल्याचं जाणवतं.
advertisement
ही संस्कृती एवढी का वाढतेय?
सोशल मीडियाचा प्रभाव, इंस्टाग्राम स्टोरीजवर खर्च दाखवण्याची हौस, मित्र-मैत्रिणींना इम्प्रेस करणं, किंवा गटात स्वतःला "उदार" दाखवण्याची इच्छा. हे काही मोठे कारणं आहेत. कॉलेजच्या किंवा पहिल्या नोकरीच्या टप्प्यात असलेली ही तरुण पिढी सहसा कमावायला सुरुवात करताच, स्वतःवर व मित्रांवर खर्च करणं हा एक प्रकारे "लाइफस्टाइल स्टेटमेंट" मानते.
त्याचा परिणाम काय होतो?
दर आठवड्याला किंवा महिन्यातून अनेकदा ट्रीट दिल्याने मोठी रक्कम खर्च होते.
कधी कधी क्रेडिट कार्ड किंवा UPI क्रेडिटचा वापर करून खर्च केला जातो.
महिन्याच्या शेवटी गरजेच्या खर्चासाठी पैसा अपुरा पडतो.
यातून बाहेर पडण्याचा उपाय?
महिन्याचा खर्च वाचवण्यासाठी ट्रीट्ससाठी वेगळा बजेट ठेवा. प्रत्येकवेळी "मी देतो" म्हणू नका, खर्च शेअर करा, मित्रांना ही सवय लावा. सोशल मीडियासाठी खर्च थांबवा, फक्त फोटो टाकण्यासाठी उगाच खर्च करणं टाळा.
