TRENDING:

What is GR : सरकार जीआर काढणार म्हणजे नक्की काय? सोप्या शब्दात समजून घ्या

Last Updated:

What is GR : आपण जीआर (GR) हा शब्द वारंवार ऐकला असेल. पण तुम्हाला माहिती का की जीआर म्हणजे नक्की काय?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठा आंदोलकांच्या मागण्या संदर्भात सरकार नवीन जीआर काढणार आहे.  एवढच नाही तर आपण अनेकदा जीआर (GR) हा शब्द ऐकला असेल. सरकारकडे कोणतीही मागणी केली किंवा नवीन गोष्ट लागू करायची झाली की सरकार त्याचं जीआर काढतं असं आपण अनेकदा ऐकलं आहे, पण तुम्हाला माहितीय का की जीआर म्हणजे काय? सरकार जीआर काढतं म्हणजे नक्की काय करतं? चला सोप्या शब्दात समजून घेऊ.
AI Generated Photo
AI Generated Photo
advertisement

जीआर म्हणजे काय? (What is GR)

जीआर म्हणजे "शासन निर्णय" (Government Resolution). हा एक अधिकृत शासकीय दस्तऐवज असतो, ज्याद्वारे शासन एखादा नवा नियम, धोरण, योजना किंवा बदल जाहीर करते. राज्य सरकारकडून घेतलेले महत्त्वाचे निर्णय, त्याची अंमलबजावणी आणि मार्गदर्शक तत्वे याच जीआरद्वारे कळवली जातात.

जीआर कसा लागू होतो?

जीआर राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडून तयार केला जातो. त्यावर शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर तो अधिकृतपणे जारी केला जातो. जीआर जाहीर झाल्यानंतर तो सर्व शासकीय कार्यालयांना पाठवला जातो आणि संबंधित योजना किंवा नियमांची अंमलबजावणी सुरू होते.

advertisement

जीआर का महत्त्वाचा असतो?

जीआर हा शासनाच्या निर्णयाचा अधिकृत पुरावा असतो. उदाहरणार्थ शैक्षणिक आरक्षण किंवा नवी प्रवेश प्रक्रिया लागू करताना, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी किंवा अनुदान योजना राबवताना, कर्मचार्‍यांचे वेतनमान बदलताना, तसेच आरक्षणासंदर्भातील निर्णय स्पष्ट करण्यासाठी जीआर महत्वाचा आहे.

मराठी बातम्या/Viral/
What is GR : सरकार जीआर काढणार म्हणजे नक्की काय? सोप्या शब्दात समजून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल