पण या सगळ्यामुळे अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे की नक्की पाकिस्तानचा ड्रोन आला (what is drone attack) किंवा त्याला उद्धवस्त केला म्हणजे नक्की काय केलं? चला याला थोडं सोप्या शब्दात समजून घेऊ.
आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की ड्रोन म्हणजे काय, मुख्यता आर्मी ड्रोन काय असतात, ते कसे काम करतात, आणि त्यांचा हल्ला कशासाठी केला जातो. (what is mean by drone attack)
advertisement
ड्रोन म्हणजे काय? (what is drone)
ड्रोन हे एक छोटे, पायलट शिवाय म्हणजेच कोणत्याही माणासाच्या उपस्थीतीशिवाय उडणारं यंत्र आहे. तर लष्करी ड्रोन हे विमानासारखे असतात. जे दूरवरून नियंत्रित केले जातात. या ड्रोनमध्ये कॅमेरे, सेन्सर, बॉम्ब किंवा शस्त्रही बसवले जातात.
ड्रोनचे तीन मुख्य उपयोग असतात:
लक्षण ठेवणं (Surveillance): सीमांवर किंवा दुर्गम भागांमध्ये हालचालींचा मागोवा घेण्यासाठी
हल्ला (Attack): लहान शस्त्रांनी युक्त ड्रोन थेट लक्ष्यावर हल्ला करू शकतो
सामान वाहतूक (Logistics): लष्करी किंवा नागरी ठिकाणी आवश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी
ड्रोन हल्ला म्हणजे काय? (what is drone attack)
जेव्हा एखाद्या देशाचा ड्रोन दुसऱ्या देशाच्या हद्दीत बेकायदेशीरपणे घुसतो आणि टेहळणी, बॉम्ब टाकणे किंवा माहिती गोळा करतो, तेव्हा तो ड्रोन हल्ला समजला जातो. हा थेट देशाच्या सुरक्षेवर परिणाम करतो.
म्हणजेच पाकिस्तानचा ड्रोन जर भारताच्या सीमेत प्रवेश करून कॅमेऱ्याने लष्करी हालचाली टिपत असेल किंवा शस्त्र घेऊन आलेला असेल, तर तो भारताच्या सुरक्षेला धोका ठरतो. त्यामुळे त्याला निकामी केलं जातं किंवा उडवलं जातं.
हल्ला करणारे ड्रोन किती मोठे असतात?
उदाहरणार्थ, MQ-1 प्रीडेटर ड्रोनचा आकार अंदाजे एका लहान कारसारखा आहे, तर MQ-9 रीपर एका लहान विमानासारखा आहे. RQ-4 ग्लोबल हॉक लक्षणीयरीत्या मोठा आहे, जो एका लहान व्यावसायिक विमानासारखा आहे.
भारताने पाकिस्तानचा ड्रोन पाडला म्हणजे नक्की काय केलं?
अलीकडेच भारतीय सुरक्षा यंत्रणांनी जम्मू-काश्मीर आणि पंजाब सीमारेषेजवळ अनेकदा पाकिस्तानकडून पाठवलेले ड्रोन शोधून काढले. काही ड्रोनमध्ये शस्त्र, अमली पदार्थ, बॉम्ब किंवा टेहळणीसाठी कॅमेरे होते. भारतीय लष्कर, सीमा सुरक्षा दल (BSF), किंवा इतर यंत्रणा या ड्रोनना वेळीच ओळखून त्यांच्यावर गोळ्या झाडतात किंवा खास अँटी-ड्रोन डिव्हाइसेस वापरून त्यांना हवेतच पाडतात.
म्हणजेच भारताने प्रत्यक्ष त्या पाकिस्तानी ड्रोनला निष्क्रिय केलं, म्हणजेच "पाडून टाकलं".
भारताचा अँटी-ड्रोन बचाव यंत्रणा (Anti-Drone Defense System)
भारत सरकार आणि लष्कर अलीकडच्या काळात अँटी-ड्रोन तंत्रज्ञान वापरत आहे. हे रेडार आणि थर्मल सेन्सर ड्रोन ओळखतात. ड्रोनचं सिग्नल ब्लॉक करतात. तसेच हाय पॉवर लेझर किंवा शस्त्रांनी ड्रोन पाडले जातात.
शेवटी सांगायचं झालं तर...
ड्रोन युद्धाचा नवा चेहरा बनत आहेत. भारतासारखा मोठा देश आपल्या सीमांची सुरक्षा करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे. ड्रोन पाडल्याची बातमी ही केवळ तांत्रिक विजय नाही, ती आपल्या देशाच्या सुरक्षिततेची खात्री आहे.
