KBC 17 मध्ये 1 कोटी रुपये जिंकल्यानंतर आदित्य कुमार अचानक सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले. ते कोण आहेत? काय करतात? यांसारख्या असंख्य प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. त्यांपैकी अदित्या यांच्याबद्दल काही माहिती समोर आली आहे.
उत्तराखंडचे आदित्य कुमार हे सध्या पंजाब कॅडरमध्ये ASP (Assistant Superintendent of Police) म्हणून कार्यरत आहेत. KBC 17 मध्ये त्यांनी आपल्या आत्मविश्वासाने आणि बुद्धिमत्तेने 1 कोटी रुपयांचा प्रश्न बरोबर सोडवला आणि शोचे पहिले करोडपती ठरले. मात्र 7 कोटींच्या प्रश्नावर धोका न पत्करता त्यांनी खेळ सोडला आणि 1 कोटी रुपयांसह घरी परतले.
advertisement
अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसून त्यांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर जिंकलेली ही रक्कम जरी मोठी असली तरी त्यांचा UPSC पर्यंतचा प्रवास खूप संघर्षपूर्ण राहिला. 3 वेळा अपयश पचवल्यानंतर अखेर २०१७ मध्ये त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि 2018 मध्ये ऑल इंडिया 630वा रँक मिळवून IPS अधिकारी झाले.
IPS अधिकारींचा पगार किती असतो?
IPS अधिकाऱ्यांचा पगार 7 व्या वेतन आयोगानुसार ठरतो. सुरुवातीच्या स्तरावर (ASP किंवा DSP पदावर) त्यांचा बेसिक पगार ₹56,100 ते ₹67,700 असतो. त्यासोबत महागाई भत्ता (DA), गृहभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता (TA) आणि इतर सवलती मिळून हाती मिळणारा पगार ₹60,000 ते ₹1,00,000 पर्यंत जातो. उच्च पदावर गेल्यानंतर पगार झपाट्याने वाढतो.
त्याशिवाय शासकीय निवास, वाहन, सुरक्षा कर्मचारी, वैद्यकीय सुविधा यासारख्या सोयी मिळतात.
IPS अधिकारींचा पगार जरी आकर्षक असला तरी तो केवळ पैशांपुरता मर्यादित नाही. ही नोकरी जबाबदारी, धाडस आणि सेवा भाव यांची मागणी करते.
