बाबा वेंगा यांच्या The Future I Saw या पुस्तकात भविष्यातील अनेक घटना आधीच लिहिल्या असल्याचं सांगितलं जातं. काही जणांचा दावा आहे की त्यांनी कोरोना महामारीसारखी आपत्ती येणार असल्याचं पूर्वीच सांगितलं होतं, तसेच भूकंप आणि सुनामीबाबतही त्यांच्या भाकितांचा उल्लेख आहे. मात्र, या दाव्यांना शास्त्रीय पुरावा कुठेच सापडत नाही.
2011 साली जपानच्या इतिहासातील सर्वात विध्वंसक भूकंप, ज्याला ग्रेट ईस्ट जपान अर्थक्वेक म्हटलं जातं, त्याबाबतही बाबा वेंगा यांचं नाव जोडून पाहिलं गेलं. 11 मार्च 2011 रोजी आलेल्या या भूकंपाची तीव्रता जवळपास 9 रिक्टर इतकी होती. या भूकंपामुळे निर्माण झालेल्या प्रचंड सुनामी लाटा किनारपट्टीवरून 10 किलोमीटरपर्यंत आत घुसल्या आणि जवळपास 18,500 जणांचा मृत्यू झाला किंवा ते बेपत्ता झाले.
advertisement
कोरोना महामारीच्याही काळात लोकांनी त्यांच्या भविष्यवाणींचा उल्लेख केला. त्यांच्या जुन्या भाकितांमध्ये एका अज्ञात प्राणघातक आजाराचा उल्लेख होता, पण ‘कोविड’ किंवा ‘कोरोना’ असं कुठेच स्पष्टपणे लिहिलेलं नव्हतं. मात्र, 2019 च्या शेवटी आणि 2020 च्या सुरुवातीला जेव्हा कोरोना पसरला, तेव्हा लोकांनी त्याला या भविष्यवाणीशी जोडून पाहिलं. लाखो लोकांचा मृत्यू झाला, जगभर लॉकडाउन लागला आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं.
त्यांच्या पुस्तकात असंही लिहिलं होतं की हा अज्ञात आजार पुन्हा परत येईल आणि अधिक शक्तिशाली होईल. 2025 मध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले असले तरी ही लाट पूर्वीसारखी धोकादायक नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही भविष्यवाणी अर्धवट खरी मानली जात आहे.
एकूणच, रियो तात्सुकी उर्फ ‘बाबा वेंगा’ यांच्या भविष्यवाण्यांवर विश्वास ठेवणारेही आहेत आणि शंका घेणारेही. काही घटना त्यांच्या भाकितांशी साधर्म्य दाखवतात, पण त्यात नेमकी तारीख, नावं किंवा ठोस माहिती नसल्याने त्यांना पूर्णपणे सत्य म्हणणं योग्य नाही. यामागे श्रद्धा किती आणि विज्ञान किती हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
