कुत्रा हा मनुष्यांसाठी सर्वांत प्रामाणिक प्राणी मानला जातो. अनेक जण कुत्रे पाळतात; पण काही जणांना त्यांच्या सगळ्या सवयींबद्दल माहिती नसतं किंवा त्यामागची कारणं माहिती नसतात. कुत्र्यांची अशीच एक सवय म्हणजे कुत्रे आपली जीभ बाहेर काढतात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, की कुत्रे बहुतांश वेळा जीभ बाहेर काढून फिरत असतात. तुम्हाला माहिती आहे का, की कुत्रे असं का करतात? त्यामागचं कारण जाणून घेऊया.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, कुत्र्यांच्या शरीराची रचना माणसाच्या शरीराच्या रचनेपेक्षा खूप वेगळी असते. बऱ्याचदा कुत्र्यांच्या काही हालचाली, त्यांचं वागणं आपल्याला कळत नाही. कुत्र्यांचं शरीर खूप गरम असतं. पशुतज्ज्ञांच्या मते कुत्रे जीभ बाहेर काढून स्वतःच्या शरीराला थंडावा देत असतात. कुत्रे आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित राखण्यासाठी आपली जीभ बाहेर काढतात. हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात कुत्रे आपली जीभ जास्त वेळा बाहेर काढतात. कुत्रे इतर प्राण्यांप्रमाणे आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी असं करतात.
Dog Tail : कुत्र्याची शेपूट नेहमी वाकडीचं का असते? कारण वाचून हैराण व्हाल
अनेकदा आपण आपल्या पाळीव प्राण्यांच्या कोणत्याही विचित्र वागणुकीकडे दुर्लक्ष करण्याची चूक करतो. त्यामुळे त्यांना अनेकदा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे या मुक्या प्राण्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुमच्या पाळीव प्राण्याच्या वागण्यात काही बदल दिसल्यास संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधा. याशिवाय, तुमचे पाळीव प्राणी कोणत्या परिस्थितीत कसे वागतात हे देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे. साधारणपणे, कुत्र्यांना जास्त उष्णता जाणवते, खासकरून युरोपियन जातीच्या कुत्र्यांना. त्यामुळे त्यांच्यासाठी शक्य तितकं थंड वातावरण असणं गरजेचं असतं.
Viral News : रात्रीच्या वेळी कुत्री का रडतात? त्यांना असं काय दिसतं? काय आहे कारण?
कुत्रे किंवा इतर कोणताही पाळीव प्राणी पाळल्यावर त्याची काळजी घेणं गरजेचं असतं. कुत्रे त्यांच्या वागणुकीतून त्यांना होणारा त्रास किंवा अडचणी सांगत असतात. त्यामुळे फक्त आवड म्हणून हे मुके प्राणी पाळण्याऐवजी त्यांना समजून घेणं हीदेखील कुत्रे पाळणाऱ्यांची जबाबदारी असते.