आपल्यालाही हे बघायला अगदी नॉर्मल वाटतं. पण कधी का विचार केलात. पुरुष सरळ पा, म्हणजे दोन्ही बाजूला टाकून बसतात, मग महिला मात्र असं एका बाजूला का बसतात?
खरंतर यामागे कुठलाही शास्त्रीय कारण नाही, तर आहे एक जुनी रूढीवादी परंपरा.
पाकिस्तानची झेनिथ इरफान नावाची एक इंस्टाग्राम क्रिएटर आहे. ती पहिली पाकिस्तानी महिला बाईकर मानली जाते, तिने वेगवेगळ्या देशात बाईकवर प्रवास केला. तिने एका व्हिडिओमध्ये या गोष्टीचं खरं कारण सांगितलं आहे.
advertisement
झेनिथच्या मते, हा प्रकार आपल्या भारतीय किंवा पाकिस्तानी संस्कृतीतला नाही. तर तो ब्रिटिश कल्चरमुळे आला.
१४व्या-१५व्या शतकात युरोपमध्ये प्रिन्सेस ऍन ऑफ बोहेमिया हिने आपल्या घोड्यावर एका बाजूने बसून तब्बल 1000 माईल (1600 किमी) प्रवास केला होता. त्या काळात जर एखादी महिला पुरुषांसारखी सरळ दोन्ही पाय टाकून बसली, तर ते "बेशरमपणा" मानला जायचा.
झेनिथ म्हणते, हा प्रकार दक्षिण आशियाई परंपरेतला कधीच नव्हता. उदाहरण द्यायचं झालं तर, आपल्या भारतातील वीरांगना राणी लक्ष्मीबाई घोड्यावर दोन्ही पाय टाकून सरळ बसून युद्ध लढायच्या. म्हणजे महिलांसाठी हे अजिबात नवं नव्हतं, तसेच महिला दोन्ही पाय टाकून घोडा किंवा कुठेही बसण्यामध्ये आपल्या आशियायी देशांमध्ये शरमपणाचं लक्षण मानलं जात नव्हतं. पण ब्रिटिश इन्फ्लुएन्समुळे आपण तसं मानू लागलो.
पण जेव्हा ब्रिटिश भारतात आले, तेव्हा त्यांचा संस्कार आणि त्यांची पद्धत आपल्या समाजात आली. बाईक आल्यानंतर महिलांनी घोड्यावर जसं बसायच्या, तसंच बाईकवरही एका बाजूने बसायला सुरुवात केली.
म्हणजेच, महिला बाईकवर एका बाजूने बसतात यामागे कोणतंही विज्ञान नाही. हे फक्त शेकडो वर्षांपूर्वीच्या संस्कृती आणि समाजाच्या नियमांचं परिणाम आहे. आजही आपल्याकडे तो ट्रेंड टिकून आहे.