हे ऐकायला विचित्र वाटत असलं तरी यामागे महत्त्वाचे कारण आहे. DGCA च्या मार्गदर्शनानुसार, भारतात प्रत्येक पायलटला उड्डाणापूर्वी ब्रेथलायझर टेस्ट द्यावी लागते. या चाचणीमुळे पायलटने अल्कोहोल घेतले आहे का नाही याची खात्री होते. पण समस्या अशी की, परफ्युम, माउथवॉश, हँड सॅनिटायझर यांसारख्या दैनंदिन उत्पादनांमध्ये एथिल अल्कोहोल असतो. त्यामुळे पायलटने दारू न घेतली असली तरी या उत्पादनांमुळे चुकीचा निकाल येऊ शकतो.
advertisement
अलीकडेच कॅप्टन अवधेश तोमर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत यामागील खरी कारणं सांगितली. त्यांनी स्पष्ट केलं की परफ्युम वापरणं आवडत असलं तरी त्यातील अल्कोहोलमुळे ब्रेथलायझरमध्ये चुकीची रीडिंग येऊ शकते.
हे डिव्हाइस इतकं संवेदनशील आहे की अगदी 0.0001% अल्कोहोलचीही नोंद करतं. परिणामी, पायलटने अल्कोहोल घेतलं नसतानाही तो दोषी ठरू शकतो, ज्यामुळे उड्डाण उशिरा होऊ शकतं आणि पायलटवर कारवाईही होऊ शकते.
ऑक्टोबर 2023 मध्ये DGCA ने यासंदर्भात मसुदा जारी केला. यात स्पष्टपणे नमूद आहे की पायलट्स आणि क्रू मेंबर्सनी अल्कोहोलयुक्त परफ्युम, माउथवॉश, काही जेल्स किंवा औषधं यांचा वापर टाळावा. जर अशा औषधांचा वापर आवश्यक असेल, तर संबंधित कंपनीच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन परवानगी घेणे बंधनकारक आहे.
पायलट्सना परफ्युम लावू नये असा नियम जरी विचित्र वाटत असला तरी त्यामागे शास्त्रीय कारणं आहेत. अल्कोहोलयुक्त उत्पादनांमुळे ब्रेथलायझर चाचणीवर परिणाम होऊ शकतो आणि प्रवासाच्या सुरक्षिततेत अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणूनच DGCA ने हा नियम कडकपणे लागू केला आहे.
