अमेरिकेत राहणाऱ्या या महिलेने नुकताच तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती नवऱ्यासोबत पहिल्यांदाच लांबच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइटने प्रवास करत होती. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित होतं, पण प्रवासाच्या काही तासांनंतर नवऱ्याच्या वागण्यामुळे तिचा मूडच बिघडला.
महिलेनं सांगितलं की ती स्वच्छतेबाबत खूप जागरूक आहे. विमानात तिने कधीही बूट किंवा मोजे काढलेले नाहीत. मात्र तिच्या नवऱ्याने फक्त बूटच नाही तर मोजेही काढले आणि विना चपलीचा तो फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये गेला. हे पाहून ती संतापली आणि तिला अतिशय घाण वाटलं. यावरून दोघांमध्ये वाद झाला.
advertisement
तिचा त्रास इथेच थांबला नाही. हॉटेलवर पोहोचल्यानंतर पतीने झोपण्यापूर्वी आंघोळ करण्यासही नकार दिला. यामुळे बायकोला त्याच्या अस्वच्छ सवयी लक्षात आल्या आणि ती विचार करू लागली की एवढ्या वर्षांत तिने हे कसं दुर्लक्ष केलं.
अनेक वेळा प्रवाशांना माहीत नसतं की विमानातील टॉयलेट्स फारसे स्वच्छ नसतात. नियमित साफसफाई होत असली तरी त्यात जीवाणूंचा धोका असतो. काही काळापूर्वीच एका फ्लाइट अटेंडंटने तिच्या पुस्तकात विमान प्रवासाशी संबंधित अनेक गुपितं उघड केली होती. त्यामुळे या महिलेला आलेली भीती काही अंशी खरीही आहे.
तिने सोशल मीडियावर लोकांना विचारलं की अशा अनुभवामुळे लग्नात दुरावा येऊ शकतो का? की हा अनुभव विसरून नवऱ्याशी पुन्हा जुळवून घ्यावं? यावर लोकांनी देखील वेगवेगळी उत्तरं दिली आहेत. काहींनी तिला याकडे कानाडोळा करुन दुर्लक्ष करण्यासाठी सांगितलं आहे तर काहींनी तिला सांगितलं की ही सवय अशीच राहिली तर नवऱ्यामुळे तिलाही त्रासाला सामोरं जावं लागतं, त्यामुळे एकतर नवऱ्याची सवय बदल नाहीतर नवराच बदल असं उत्तर दिलं.
