मध्य प्रदेशातील इंदूरमधील विजय नगरमधील हे प्रकरण. शीतल नगर येथील रहिवासी संदीपचं लग्न एक वर्षापूर्वी नेहा नावाच्या महिलेशी झालं होतं. नेहाचं हे चौथं लग्न होतं आणि तिला आधीच्या लग्नांपासून दोन मुलंही आहेत. लग्नापासून नेहा आणि तिची सासू गोमतीबाई यांच्यात छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणं होत असत. या सगळ्यामध्ये संदीपला कामासाठी बाहेर जावे लागत असे.
advertisement
मध्यरात्री आईबाबांच्या रूममधून येत होता आवाज, मुलाने डोकावलं, दृश्य पाहून अंगाचं पाणी पाणी झालं
एकदा नेहाची तब्येत बिघडल्यामुळे तिने तिच्या सासूला जेवण बनवायला सांगितलं. पण तिने जेवण बनवण्यास नकार दिला. यानंतर सासू आणि सूनमध्ये वाद सुरू झाला. त्यावेळी संदीप घरी नव्हता. हा वाद हळूहळू इतका वाढला की तो मारामारीपर्यंत पोहोचला. रागाच्या भरात नेहाने गोमतीला बाथरूममध्ये ओढलं आणि तिथं ढकलले. नेहाने जवळच पडलेला एक दगड उचलला आणि गोमतीच्या डोक्यात घातला. दगडाने तिने डोक्यावर वारंवार वार केले. या हल्ल्यांमुळे गोमती रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच पडली.
बोंबला! हॉटेल रूमचा पडदा लावायचं राहिलं, रस्त्यावरील लोकांनी सगळं पाहिलं, कपलचा रोमान्स, ट्रॅफिक जाम
घटनेची माहिती मिळताच संदीप आणि त्याचे वडील कौशल घरी पोहोचले. तिथे त्यांना गोमती बाथरूममध्ये रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेली दिसली. त्यांनी तिला ताबडतोब रुग्णालयात नेलं, परंतु डॉक्टरांनी गोमतीला मृत घोषित केलं.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत नेहाला ताब्यात घेतलं आणि तिच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नेहा आणि संदीपचं लग्न फक्त एक वर्ष झालं होतं. या घटनेमागील सर्व पैलू समजून घेण्यासाठी पोलीस या प्रकरणात नेहाच्या मागील वैवाहिक जीवनाबद्दल आणि तिच्या मुलांबद्दलही माहिती गोळा करत आहेत.