41 वर्षीय व्यक्ती जिने पत्नीचं कुत्र्यावर प्रेम आणि त्यामुळे आपल्याला झालेली लैंगिक समस्या असा दावा करत गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि घटस्फोटाची मागणी केली आहे. त्याने असा आरोप केला आहे की पत्नीने भटक्या कुत्र्यांना घरात आणले आणि त्याच्या काल्पनिक विवाहबाह्य संबंधांबद्दल प्रँक कॉल ज्यामुळे त्याचा अपमान झाला.
बायकोचा मृत्यू, 28 वर्षांनी लहान मोलकरणीशी केलं लग्न; त्यानंतर घडलं असं..., कुटुंबात खळबळ
advertisement
2006 साली लग्न झालेलं हे कपल. अशा सोसायटीत राहत होते जिथं कुत्रे पाळण्यास बंदी होती. असं असताना व्यक्तीच्या बायकोने कुत्रा पाळला. तोसुद्धा भटका कुत्रा. तिने भटका कुत्रा घरी आणून पाळला. एकावरच ती थांबली नाही तर तिने आणखी काही भटके कुत्रे घरात आणले. त्यानंतर नवऱ्याला स्वयंपाक, स्वच्छता करायला लावली, कुत्र्यांची काळजी घ्यायला लावली. व्यक्तीने सांगितलं एकदा तर एक कुत्रा झोपण्यासाठी त्यांच्या बेडवरच येत होता, त्याचवेळी तो त्याला चावला.
कुत्रे पाळण्यावर शेजाऱ्यांनीही आक्षेप घेतला. 2008 साली पोलिसात तक्रार दाखल झाली. त्यानंतर त्याची पत्नी प्राणी हक्क गटात सामील झाली आणि तिने इतरांविरोधात वारंवार पोलीस तक्रारी दाखल केल्या आणि त्यात साथ देण्यासाठी म्हणून आपल्या नवऱ्याला बोलावलं. पण त्याने तिला नकार दिल्यावर तिने त्याला शिवीगाळ केली, त्याचा अपमान केला. त्याने असाही आरोप केला की 1 एप्रिल 2007 रोजी त्याच्या पत्नीने त्याच्या कथित प्रेमसंबंधाबद्दल एका रेडिओ जॉकीला प्रँक कॉल केला, ज्यामुळे त्याला कामावर आणि समाजात लाज वाटली.
बॉयफ्रेंड नाही म्हणाला, बायकोने नवऱ्याला संपवलं; म्हणाली, 'तू नाही तर...'
तो बंगळुरूला पळून गेला पण त्याची पत्नी त्याला त्रास देत राहिली. शेवटी त्याने न्यायालयात धाव घेतली. त्याने असा दावा केला की या सर्व गोष्टींमुळे त्याला तणाव आला आणि तणावामुळे त्याचं आरोग्य बिघडलं आणि त्यामुळे इरेक्टाइल डिस्फंक्शन झालं.
2007 मध्ये त्याने अहमदाबादच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा दावा दाखल केला. पण तिने त्याने आपल्याला सोडलं होतं आणि प्राणी चळवळीची ओळख करून दिल्याचा युक्तिवाद करत स्वतःचा बचाव केला. तिने त्याचे कुत्र्यांना मिठी मारताना आणि किस करताना फोटोही सादर दिले.
लग्न झाल्यापासून सतत तेच! बायकोची नको ती सवय, 25 दिवसांतच नवऱ्याचा गेला जीव
मीडिया रिपोर्टनुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये या प्रकरणाबाबत सुनावणी झाली. कौटुंबिक न्यायालयाने पतीची याचिका फेटाळली. कोर्टाने म्हटलं, "पुरावे पाहता याचिकाकर्ता प्रतिवाद्याने क्रूरपणे वागवलं किंवा सोडून दिलं, हे सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. घटस्फोट मागण्याचं हे कारण असू शकत नाही.
पण पतीने घटस्फोटाची मागणी केली आहे, यासाठी 15 लाख रुपये पोटगी देण्याची तयारीही दर्शवली आहे. तर पत्नीने 2 कोटी रुपयांचा आग्रह धरला आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पुढील सुनावणी 1 डिसेंबर रोजी होणार आहे.
