सु्ट्टीमध्ये कपलनं हॉटेलमध्ये थांबायचं ठरवलं. पहिल्यांदाच ते दोघं एकत्र अशा ठिकाणी आले होते. पण रिसेप्शनवर पोहोचताच अचानक मुलीचा फोन हॉटेलच्या Wi-Fi नेटवर्कला ऑटोमॅटिक कनेक्ट झाला. यावरून तिच्या बॉयफ्रेंडला शंका आली की ती याआधीही कोणासोबत या हॉटेलमध्ये आली असावी. त्याने तिला ‘धोकेबाज’ ठरवलं आणि नातं मोडण्याचा निर्णय घेतला.
मुलीनं वारंवार आपल्या बॉयफ्रेंडला सांगायचा प्रयत्न केला की ती इथे पहिल्यांदा आली आहे. पण तो ऐकायला तयार नव्हता आणि त्याला हेच वाटत होतं की त्याच्या गर्लफ्रेंडनं त्याला फसवलं आहे आणि त्याने हे नातं तोडलं.
advertisement
ली असं या तरुणीचं नाव होतं. लीने हा किस्सा आपल्या मित्रमैत्रिणींना सांगितला, पण कुणाचाही तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. मनातून खचलेल्या लीनं स्वतःच यामागचं कारण शोधायचं ठरवलं. तपासात उघड झालं की काही वर्षांपूर्वी ली चोंगकिंगमधल्या एका हॉटेलमध्ये काम करत होती. विशेष म्हणजे, त्या हॉटेलचं Wi-Fi नेटवर्क आणि पासवर्ड हे सध्याच्या हॉटेलसारखंच होतं. म्हणूनच तिचा फोन या नव्या ठिकाणी पण आपोआप कनेक्ट झाला होता. ही घटना चीनमधील आहे.
लीनं ही गोष्ट चोंगकिंग टीव्हीला सांगितली. जेव्हा रिपोर्टर तिच्या जुन्या कामाच्या ठिकाणी गेला, तिथेही तिचा फोन तिथल्या Wi-Fi ला लगेच कनेक्ट झाला. यावरून स्पष्ट झालं की हा प्रकार पूर्वी सेव्ह केलेल्या नेटवर्कमुळे घडला होता.
सायबर सिक्युरिटी तज्ञ लियू यांच्या मते, जर फोनमध्ये जुना Wi-Fi नेटवर्क सेव्ह असेल आणि तसाच नाव-पासवर्ड असलेलं नेटवर्क दुसऱ्या ठिकाणी दिसलं, तर फोन आपोआप त्याला कनेक्ट होतो. अशा गैरसमजांना टाळण्यासाठी त्यांनी मोबाईलमधलं ‘Auto Connect’ फंक्शन बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे.