तुम्हीसुद्धा तुमचा असा विमा काढला असेल. हेल्थ इन्शुरन्सबाबत तर तुम्हाला माहिती असेलच. पण तुम्ही कधी तोंडाच्या इन्शुरन्सबाबत ऐकलं तरी आहे का? एका अभिनेत्रीने तिच्या तोंडाचा विमा काढला आहे. तोसुद्धा थोडाथोडका नव्हे तर तब्बल 16 कोटींचा.
तब्बल 16 कोटींचा तोंडाचा विमा... वाचूनच तुम्हाला चक्कर आली असेल. ही अभिनेत्री कोण आहे, तिच्या तोंडात असं काय आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकताही तुम्हाला असेल. ही अभिनेत्री आहे ऑस्कर नामांकित सिंथिया एरिव्हो. तिने तिच्या तोंडाचा 20 लाख डॉलर्स म्हणजे सुमारे 1 कोटी रुपयांचा विमा काढला आहे! आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या तोंडात काय आहे?
advertisement
सिंथिया फक्त अभिनय किंवा गाण्यासाठी ओळखली जात नाही, तर ती तिच्या 'दातांच्या अंतराने' असलेल्या हास्यासाठी आणि मजबूत आवाजासाठी ओळखली जाते. आता सिंथियाचे विमा उतरवलेले हास्य फक्त हास्य नाही, तर या विम्याने तिला हॉलिवूडमधील 'सर्वात मौल्यवान हास्य' असलेली स्टार बनवलं आहे.
अभिनेत्री सिंथिया एरिवो (Photo : Instagram)
सिंथिया लिस्टरिनच्या नवीन 'वॉश युवर माउथ' मोहिमेचा चेहरा बनली आहे. ती म्हणते की तोंडाची स्वच्छता हा तिच्या आत्मविश्वासाचा आणि कामगिरीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. स्टेजवर जाण्यापूर्वी ती ब्रश आणि माउथवॉशने स्वतःला रीसेट करते.
हे असं पहिलंच प्रकरण नाही. जेनिफर लोपेझच्या 200 कोटी रुपयांच्या कथित 'बॅकसाइड इन्शुरन्स'पासून मारिया कॅरीच्या 500 कोटी रुपयांच्या पाय आणि व्होकल कॉर्डच्या कथपर्यंत, असे विचित्र विमा तिथं फॅशन बनली आहे. गॉर्डन रॅमसेने त्याच्या जिभेचा विमा उतरवला, निक कॅननने मजेत त्याच्या अंडकोषांचा विमा उतरवला आणि फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो आणि डेव्हिड बेकहॅमने त्याच्या पायांचा कोट्यवधींचा विमा उतरवला.