एका महिलेने रेडिटवर तिचा खरेदीचा अनुभव शेअर केला आहे. महिलेने सांगितलं, "मी हे बूट मला छान वाटले म्हणून मी खरेदी केले. नंतर मला कळलं की त्याचं लेदरही चांगल्या क्वालिटीचं होतं. जेव्हा मी ब्रँडचं नाव पाहिलं तेव्हा मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता."
तिने त्या बुटाचे फोटो आणि किंमतही शेअर केली आहे. ख्रिश्चन लूबाउटिनचे एन हायवर लग लो नावाचे हे बूट. ब्रँडच्या वेबसाइटवर त्याची किंमत जवळपास 1.3 लाख रुपये आहे.
advertisement
Alcohol Facts : दारू प्यायल्यावर भिगी बिल्लीही बनते शेर! दारूत असं असतं तरी काय?
हा फ्रेंच लक्झरी ब्रँड 1990 च्या दशकात त्याच्या हाय हिल्सच्या स्टिलेटोसाठी जगभरात प्रसिद्ध झाला. त्याची खासियत अशी आहे की प्रत्येक बूट हाताने बनवलेला असतो आणि त्याचा सोल चमकदार लाल रंगाचा असतो. या बूटांच्या सोलवरील लाल सोल हा ख्रिश्चन लूबाउटिन ब्रँडचा एक महत्त्वाचा भाग आहे.
Didn’t think I would ever score big enough to post here but I hit the jackpot with these!
महिलेने लिहिलं, "हे अस्सल लूबाउटिन आहेत आणि फक्त 17 डॉलर्समध्ये! मी कधीच विचार केला नव्हता की मी इतका मोठा शोध लावेन. "
हातही नीट जात नव्हता एवढासा खड्डा, त्यात पडला पप्पी; पोलिसांनी कसं वाचवलं, VIDEO पाहाच
अनेकांना कपडे आणि बूट खरेदी करायला आवडतात, पण सर्वांनाच महागडे ब्रँड परवडत नाहीत. अनेकांना नवीन वस्तूही परवडत नाहीत, म्हणून ते सेकंड-हँड वस्तू घेतात. या महिलेनेही तेच केलं. तिने एका सेकंड-हँड दुकानातून हे बूट खरेदी केले. पण जेव्हा तिने कंपनी पाहिली तेव्हा ती थक्क झाली. आपल्याला जॅकपॉटच लागला असं तिला वाटलं.
