TRENDING:

लग्नाला झाली 23 वर्षे, अन् महिलेला आहेत 24 अपत्ये, मोठा 18 वर्षांचा तर सर्वात लहान 2 वर्षांचा?, नेमकं खरं काय?

Last Updated:

एक महिला ही 24 मुलांची आई आहे. या 24 अपत्यांमध्ये तिला 16 मुले आणि 8 मुली आहेत. यामध्ये सर्वात मोठा मुलगा हा 18 वर्षांचा तर सर्वात लहान 2 वर्षांचा आहे, असा दावा या महिलेने केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अंबेडकरनगर : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. तसेच जीवनशैली बदलली आहे. विचारही लोकांचे आधुनिक होत आहेत. हम दो और हमारे दो पेक्षा आता हम दो आणि हमारा एक, इथपर्यंत तर इतकेच नव्हे तर अनेकांना लग्नानंतर मूलबाळही नकोसे वाटते. अशा अनेक घटना समोर येतात. मात्र, यातच आता आणखी एक घटना समोर आली आहे.
खुशबू पाठक
खुशबू पाठक
advertisement

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, एक महिला ही 24 मुलांची आई आहे. या 24 अपत्यांमध्ये तिला 16 मुले आणि 8 मुली आहेत. यामध्ये सर्वात मोठा मुलगा हा 18 वर्षांचा तर सर्वात लहान 2 वर्षांचा आहे, असा दावा या महिलेने केला आहे.

advertisement

खुशबू पाठक असे व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील महिलेचे नाव आहे. या महिलेच्या लग्नाला 23 वर्षे झाले असून तिला 24 अपत्ये असल्याचे तिने म्हटले आहे. व्हिडिओमध्ये ती मुलांचे नाव सांगताना अडखळताना दिसत आहे. आपल्या मुलांचे नाव नंबरनुसार, म्हणजे एक, दोन, तीन असे ठेवले आहे.

health tips in marathi : रात्री झोपण्यापूर्वी अजिबातच हे पदार्थ खाऊ नयेत, डॉक्टरांचं ऐकायला हवं

advertisement

सोशल मीडियावर या महिलेचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याबाबत लोकल18 च्या टीमनेही सत्य काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर लोकल18 च्या तपासात समोर आले की, खूशबू पाठक या महिलेने केलेला हा दावा चुकीचा आहे. तिला फक्त दोन मुले आहेत. इतकेच नव्हे तर तिच्या रेशनकार्डवरही फक्त 2 मुलांचा उल्लेख आहे.

advertisement

लाडक्या गणरायाचं आगमन होणार, बाजारपेठाही सजल्या, पुण्यात याठिकाणी मिळतायेत स्वस्त वस्तू, VIDEO

या महिलेने अगदी स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने 24 मुलांचा दावा केल्यावर सोशल मीडियावरील अनेकांना हा प्रकार अगदी खरा वाटू लागला. लोकप्रियता मिळवण्यासाठी या महिलेने हा सर्व प्रकार केल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.

मराठी बातम्या/Viral/
लग्नाला झाली 23 वर्षे, अन् महिलेला आहेत 24 अपत्ये, मोठा 18 वर्षांचा तर सर्वात लहान 2 वर्षांचा?, नेमकं खरं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल