सागर : सध्या चोरीच्या, तसेच गुन्हेगारीच्या विविध घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे पोलिसांनी या महिलेची अडचण सोडवण्यासाठी तिला आपल्या गाडीत बसवले आणि तिला घरी सोडले. महिलेला पोलीस गाडीत पाहून शेजाऱ्यांना प्रश्न पडला. नेमके काय झाले, याचे सर्वांना कुतूहल वाटले. पण जेव्हा तक्रारीबाबत माहिती समोर आली तेव्हा सर्वजण आपापल्या घरात परतले.
advertisement
ही घटना मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील खुरई तालुक्यातील आहे. याठिकाणी राहणाऱ्या एका महिलेने जिचे नाव मुन्नी बाई असे आहे. या महिलेने शनिवारी दुपारी खुरई पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलीस ठाण्याचे प्रमुख शशि विश्वकर्मा यांच्याकडे आपला तक्रार अर्ज दिला. यामध्ये लिहिले होते की, मागील अनेक वर्षांपासून त्या बांगड्या विकण्याचे काम करत आहेत. या माध्यमातून त्या आपली उपजीविका भागवत आहेत. खुरई बाजारातच त्या अनेक वर्षांपासून आपले दुकान लावतात आणि मग सायंकाळी उशिरा घरी परततात.
लग्नानंतर या महिन्यात अजिबात माहेरी जाऊ नये, नवविवाहितेसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
नेमकं काय घडलं -
मागील 15 दिवसांपासून खुरई येथे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. त्यामुळे टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा केला जात आहे. आम्ही लोकांनी मिळून एक टँकर पाण्याने बोलावला होता. 100 रुपयांत 500 लीटरची टाकी भरली होती. मात्र, दोन दिवसांनी टाकीमधील पूर्ण पाणी गायब झाले. शेजाऱ्यांनी हे पाणी चोरले असा संशय महिलेने घेतला आहे. ज्या लोकांनी पाणी चोरले आहे, त्यांना पकडून कठोर कारवाई केली जाईल, असे महिलेने म्हटले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : महिलांना ही योजना आवडली का? अनेकांनी व्यक्त केल्या यावर प्रतिक्रिया
पोलिसांनी काय केलं -
पाणीचोरीच्या तक्रारीनंतर अर्ज वाचल्यावर पोलीस ठाण्याचे प्रमुखही काही वेळ शांत झाले. मग त्यांनी पालिकेच्या वतीने पाण्याने भरलेले टँकर बोलावले. महिलेला गाडीत बसवले. आणि पुढे टँकर आणि मागे पोलिसांची गाडी चालत राहिली. यानंतर महिलेच्या घरी आल्यावर पूर्ण टाकी भरण्यात आली. महिलेने तक्रार केली होती. त्यानंतर तिची तक्रार ऐकल्यावर त्या महिलेची पाण्याची टाकी भरण्यासाठी पाण्याने भरलेला टँकर पाठवण्यात आला आहे, अशी माहितीही पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी दिली.
