TRENDING:

Ajab Gajab : येथील महिला ओठांवर बनवतात मिशा, 'या' प्राण्याला मानतात देव, कारण आश्चर्यचकीत करेल

Last Updated:

आइ्नु लोकांचे जीवन शिकार, मासेमारी आणि जंगलातून फळभाज्या गोळा करण्यावर आधारित होते. मात्र 19व्या शतकाच्या अखेरीस त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. जपानी सरकारने त्यांच्या जमिनींवर कब्जा करून त्यांना बेदखल करण्यास सुरुवात केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जगात अनेक प्राचीन जमाती होत्या, ज्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या किंवा त्यांची ओळखच पुसली गेली. मात्र आजही काही जमाती आपली ओळख टिकवण्यासाठी संघर्ष करत आहेत. अशीच एक रहस्यमय जमात म्हणजे जपानची ‘आइ्नु’ जनजाति.
सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
advertisement

या जमातीची उत्पत्ती आजही एक कोडे मानली जाते. कधी काळी ते उत्तर आशियाच्या विस्तीर्ण भूभागावर वसलेले होते.

कसा होता त्यांचा जीवनप्रकार?

आइ्नु लोकांचे जीवन शिकार, मासेमारी आणि जंगलातून फळभाज्या गोळा करण्यावर आधारित होते. मात्र 19व्या शतकाच्या अखेरीस त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. जपानी सरकारने त्यांच्या जमिनींवर कब्जा करून त्यांना बेदखल करण्यास सुरुवात केली.

advertisement

का हिरावली गेली त्यांची जमीन आणि संस्कृती?

मेइजी रेस्टोरेशन (Meiji Restoration) दरम्यान जपानने होक्काइडोवर ताबा मिळवला आणि तिथे लाखो जपानी लोक वसले. 1899 साली ‘Hokkaido Former Aborigines Protection Act’ लागू झाला. त्यानंतर आइ्नु लोकांना डोंगराळ आणि उजाड जमिनी देण्यात आल्या. शिकार आणि मासेमारीवर बंदी घालण्यात आली आणि त्यांना जबरदस्तीने शेतीकडे वळवण्यात आले.

advertisement

त्यांना जपानी भाषा बोलण्यास, जपानी नावे धारण करण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर त्यांच्या अस्वल पूजा, पारंपरिक श्रद्धा आणि रूढी हळूहळू नष्ट होत गेल्या.

सुदैवाने, परिस्थितीत काहीसा बदल झाला आहे. 2019 साली जपानी सरकारने पहिल्यांदाच आइ्नुंना अधिकृतरीत्या मूळनिवासी (Indigenous People) म्हणून मान्यता दिली. त्यानंतर त्यांच्या संस्कृतीकडे पुन्हा लक्ष वेधले जाऊ लागले.

advertisement

होक्काइडोमध्ये स्थापन करण्यात आलेल्या आइ्नु कल्चरल सेंटरमध्ये पर्यटकांना त्यांच्या गाण्यांची, नृत्यांची आणि हस्तकलेची ओळख करून दिली जाते. अनेक ठिकाणी मारिमो फेस्टिव्हल आणि शकुशैन फेस्टिव्हल यांसारखे पारंपरिक उत्सव साजरे होतात. इतकेच नव्हे तर ‘गोल्डन कामुय’ या लोकप्रिय जपानी मंगा मालिकेतूनही आइ्नु संस्कृती जगभर पोहोचली.

तज्ञांचे म्हणणे आहे की ही केवळ प्रतीकात्मक पायरी आहे. आजही आइ्नु लोकांना त्यांच्या नद्यांमधून सॅल्मन मासे पकडण्याची, आपल्या जमिनीवर शेती करण्याची पूर्ण स्वातंत्र्य नाही. अनेक पवित्र स्थळे धरणे बांधून जलमग्न करण्यात आली आहेत.

advertisement

काय आहे आइ्नुंचे स्वप्न?

त्यांचे म्हणणे आहे की खरा सन्मान तेव्हाच मिळेल जेव्हा ते पुन्हा आपल्या जमिनी, नद्या आणि जंगलांसह पूर्वजांसारखे मुक्तपणे राहू शकतील. ते आपली हरवलेली भाषा पुन्हा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. युनेस्कोने (UNESCO) या भाषेला अत्यंत संकटग्रस्त घोषित केलं आहे.

महिलांच्या ओठांवर का काढतात‘मिशी’?

आइ्नु जनजातिची एक आगळीवेगळी परंपरा जगभर चर्चेत राहिली आहे. येथे महिला आपल्या ओठांच्या भोवती काळ्या रंगाचा रुंद टॅटू करवून घेत असत. दूरून पाहता हा टॅटू काळ्या मिशांसारखा दिसत असे. परंतु प्रत्यक्षात हा टॅटू सौंदर्य, प्रौढत्व आणि विवाहितपणाचे प्रतीक मानला जात असे. दुसरीकडे, पुरुष खऱ्या दाढी-मिशा ठेवत असत, त्यामुळे बऱ्याचदा लोक महिलांच्या टॅटूला खऱ्याखुऱ्या मिशा समजत.

मराठी बातम्या/Viral/
Ajab Gajab : येथील महिला ओठांवर बनवतात मिशा, 'या' प्राण्याला मानतात देव, कारण आश्चर्यचकीत करेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल