गुजरातमधील वडोदरा शहरात नुकतीच घडलेली एक घटना पाहून लोकं थक्क झाले आहेत. रोजच्या वाहतुकीत ट्रॅफिक जाम हा प्रकार नवीन नाही, पण या वेळी कारण अगदी भन्नाट होतं ते म्हणजे फक्त 2 पानीपुरी कमी मिळाल्या.
होय, तुम्ही बरोबर वाचलं! दोन पानीपुरींवरून एका महिलेने रस्त्यावर असा गोंधळ घातला की पोलिस आणि सामान्य नागरिक तासन्तास हैराण झाले.
advertisement
काय झालं नेमकं?
सूरसागर तलावाजवळील रस्त्यावर महिला पानीपुरीच्या गाडीवर गेली. नियमाप्रमाणे ₹20 मध्ये 6 पानीपुरी मिळायच्या. मात्र त्या महिलेच्या हातात विक्रेत्याने फक्त 4 पानीपुरी दिल्या. एवढ्यावरून महिलेचा राग एवढा वाढला की तिने थेट रस्त्याच्या मधोमध धरना आंदोलन सुरू केलं. "मला दोन पानीपुरी अजून द्या नाहीतर हा ठेला इथून काढून टाका!" अशी हट्टाची मागणी करत ती छोट्या मुलीसारखी जमिनीवर बसली. काही वेळातच गाड्यांच्या लांबलचक रांगा लागल्या आणि संपूर्ण रस्ता जाम झाला.
A woman started crying and protesting on the road in Surat, because a Panipuriwala gave her 4 panipuris instead of 6 for 20Rs
Grave injustice .pic.twitter.com/v3tTbFW02O
—
पोलिसांना माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकायला तयार नव्हती. रडत-रडत ती म्हणाली – "हा पानीपुरीवाला सगळ्यांना 6 देतो, मला 2 कमी देतो. तो दादागिरी करतो. माझ्याशी नेहमी भांडतो. याचा ठेला बंद करून टाका!" महिलेचा हा हट्ट ऐकून लोकं हसून-हसून लोटपोट होत होते. मात्र तासन्तास झालेल्या या ड्राम्यानं पोलिसांना घाम फुटला. शेवटी मेहनत घेऊन पोलिसांनी तिला समजावलं आणि तिला तिथून उचलून नेलं. त्यानंतरच रस्त्यावरील जाम सुटला.
शहरभर घटनेची चर्चा
या 2 पानीपुरी ड्राम्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कुणी म्हणतं "स्त्री है, कुछ भी कर सकती है..." तर कुणी म्हणतं "अशी ही पानीपुरी क्रांती फक्त भारतातच बघायला मिळते!" काहींनी महिलेच्या वागण्या मुर्खपणा म्हटलं आहे. तर अनेकांनी तिने बरोबर केलं असं म्हणत तिला पाठिंबा दिला आहे.
लोकं या व्हिडिओवर मीम्स, जोक्स बनवत आहेत, ज्यामुळे आता हा व्हिडीओ फक्त कमी वेळातच सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत आहे.