एक 29 वर्षीय महिला हॉली फर्थ (Holly Firth) हिला कधी वाटलंच नव्हतं की ती आई बनेल. जुलै 2024 मध्ये ती एका लग्न समारंभात पाहुणे म्हणून गेली होती. तिथे तिची एका अनोळखी व्यक्तीशी भेट झाली आणि त्यांच्यात वन-नाइट स्टँड झाला.
दुसऱ्याच दिवशी तिनं गर्भधारणा टाळण्यासाठी मॉर्निंग आफ्टर पिल घेतली होती. पण नशिबानं वेगळाच खेळ आखला होता.
advertisement
सुमारे दोन आठवड्यांनी हॉलीला समजलं की ती गर्भवती आहे. पहिल्या तपासणीत ती एका बाळाला जन्म देणार असल्याचं सांगण्यात आलं, मात्र नंतरच्या स्कॅनमध्ये समजलं की तिच्या गर्भात जुळी मुलं आहेत.
27 फेब्रुवारी 2025 रोजी हॉलीने दोन गोंडस मुलींना जन्म दिला. शार्लट (Charlotte) आणि रोज़ (Rose) फर्थ. दोन्ही मुली पूर्णपणे स्वस्थ असून हॉली सध्या त्यांना सांभाळत आहेत.
या प्रकरणातील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हॉलीला आपल्या मुलींचे जैविक वडील कोण आहेत हे नीट माहिती नाही. तिला त्या व्यक्तीचा चेहरासुद्धा आठवत नाही. टिकटॉकवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये तिनं मजेत सांगितलं. “लोक विचारतात की मुली त्यांच्या वडिलांसारख्या दिसतात का, तर मी फक्त हसते आणि म्हणते मला माहीत नाही, कारण मी त्यांना फक्त एकदाच पाहिलं होतं आणि तेव्हाही मी खूप नशेत होते.”
हॉली सध्या एक सिंगल मदर म्हणून आपल्या दोन्ही मुलींना वाढवत आहे. ती म्हणते, “माझा आई होण्याचा काही विचार नव्हता. हे सगळं अचानक घडलं, पण आता मला वाटतं की जर असं घडलं नसतं तर माझ्या मुलीच माझ्या आयुष्यात नसत्या. मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा जितकं प्रेम जाणवलं तितकं कधीच नाही. आता त्यांच्या शिवाय जीवनाची कल्पनाच नाही.”
https://www.instagram.com/hollylou.twinmum/?utm_source=ig_web_button_share_sheet
हॉलीने स्पष्ट केलं की तिनं आफ्टर पिल घेतली होती, पण तरीही त्याचा काही फायदा झाला नाही कारण तिचं ओव्ह्युलेशन आधीच झालं होतं, त्यामुळे ही गोळी प्रभावी ठरली नाही.
तिनं सांगितलं की मुलींचे बायोलॉजिकल वडील अजून संपर्कात आलेले नाहीत. “कदाचित भविष्यात ते कधीच संपर्क साधणार नाहीत, पण जर त्यांनी कधी मुलींना भेटायचं ठरवलं, तर माझं दार नेहमी उघडं असेल.” हॉली म्हणते, तिचं आयुष्य एका क्षणात बदललं, पण आता ती याला तिचं सौभाग्य मानते.