आर्मेनियाचा हा ट्रेडिशनल पदार्थ लवाश. आर्मेनियाचा नॅशनल ब्रेड आहे. पातळ आणि चविष्ट असा पदार्थ. पीठ, पाणी, मीठ आणि कधीकधी यीस्ट वापरून बनवला जातो. लवाश हा आर्मेनियातील प्रत्येक जेवणाचा पाया आहे. तो बार्बेक्यूमध्ये गुंडाळून, खाश सूपमध्ये बुडवून किंवा चीजसोबत रोल करून खाल्ला जातो.
लवाश स्वादिष्ट आहे, पण तो बनवणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. हा ब्रेड जगातील सर्वात धोकादायक रोटी म्हणून ओळखला जातो. कारण ती बेक करण्यासाठी शेपला त्यांचं डोकं ओव्हनच्या आत टाकावं लागतं.
advertisement
Yuck! तरुणांनी हॉटेलच्या जेवणात केली लघवी, 4000 लोकांनी खाल्लं, कुठे घडला हा प्रकार?
टोनिर नावाच्या मातीचं हे खोल ओव्हन. भट्टी जमिनीत दीड मीटर खोल खोदली असते. आग लावल्यानंतर त्याच्या भिंती लाल होतात. त्याची उष्णता 500 अंश सेल्सिअस असते. रोटी शेकवण्यासाठी स्वयंपाकीला भट्टीत जावं लागतं. त्याच्या शरीराचा निम्म्याहून अधिक भाग या भट्टीत जातो. जर थोडासाही तोल बिघडला तर स्वयंपाकी थेट आत जाईल आणि जळेल.
सोशल मीडियावर याचा ओव्हनही व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये आर्मेनियन मेकर ब्रेड बेक करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहेत.
अरे हा माणूस आहे की कोण? दिवसभर मिरची खातो ती खातो, पण अंघोळही मिरचीनेच, प्रायव्हेट पार्टही धुतो
ही परंपरा ईसापूर्व सहाव्या शतकातील आहे. आर्मेनियाच्या अरेनी गुहांमध्ये टोनीरचे अवशेष सापडले आहेत, जे सूचित करतं की ही ब्रेड जगण्याचा प्रतीक होता. गावांमध्ये महिला ते एकत्रितपणे बनवतात. पण धोक्यामुळे तरुण पिढी आता आधुनिक ओव्हन किंवा मशीनकडे वळत आहे. आर्मेनियन तज्ञांच्या मते, ही परंपरा शतकानुशतके जुनी आहे. हा धोका आपल्या वारशाचा भाग आहे, पण आता सुरक्षिततेचे उपाय आवश्यक आहेत.