पण तुम्ही कधी असं ऐकलंय का, की एका आईस्क्रीमची किंमत तब्बल ५.२ लाख रुपये आहे? होय! एवढ्या पैशात पाच-सहा स्कूटी खरेदी करता येतील आणि हीच किंमत आहे जगातील सर्वात महागड्या आईस्क्रीमची.
जगातील सर्वात महागडं आईस्क्रीम
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार जपानमधील Cellato या कंपनीने हे अनोखं आईस्क्रीम तयार केलं आहे. त्याची किंमत आहे तब्बल 8,73,400 जपानी येन म्हणजेच सुमारे 5.2 लाख रुपये. आता प्रश्न असा येतो की, शेवटी एका आईस्क्रीममध्ये एवढं महाग काय आहे?
advertisement
एवढं महाग का?
या आईस्क्रीममध्ये वापरले गेलेले घटक खूपच दुर्मीळ आणि महाग आहेत. यात व्हाईट ट्रफल्स घातले आहेत, जे इटलीच्या अल्बा भागात मिळतात. त्यांची किंमत जवळपास 12 लाख रुपये किलो आहे.
याशिवाय यात Parmigiano Reggiano नावाचं महागडं चीज वापरलं गेलं आहे. तसेच साके ली नावाचं घटकही आहे, जे जपानी ड्रिंकमधून मिळतं.
जपानी-युरोपियन फ्युजन
Cellato ब्रँडचं उद्दिष्ट होतं जपानी आणि युरोपियन घटकांचं एक खास फ्युजन तयार करणं. यासाठी त्यांनी ओसाकामधील 'Rivi' या फ्युजन रेस्टॉरंटचे चीफ शेफ तडायोशी यामादा यांची मदत घेतली. कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, व्हाईट ट्रफल्समुळे या आईस्क्रीमला अप्रतिम सुगंध येतो. Parmigiano Reggiano मुळे फळांचा हलकासा स्वाद तर साके ली मुळे एक वेगळाच अनुभव मिळतो.
Cellato च्या प्रवक्त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सला सांगितलं की, योग्य चव तयार करण्यासाठी त्यांना सातत्याने प्रयत्न करावे लागले. या परिपूर्ण फॉर्म्युला तयार होण्यासाठी तब्बल 1.5 वर्षं लागली.