Numerology: त्रास आमच्या पाचवीलाच..! या 3 मूलांकाचे आयुष्य अनपेक्षित पालटणार; आशा सोडलेली पण..
- Written by:Chirag Daruwalla
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology: अंकशास्त्र भविष्यानुसार आजचा दिवस बहुतेक लोकांसाठी आनंद, मान-सन्मान आणि भावूकतेचा मेळ असणार आहे. मूलांक 1, 4, 5 आणि 6 असलेल्या लोकांसाठी प्रगती आणि आर्थिक फायद्याचे योग आहेत. मूलांक 1 ला कौटुंबिक सुख आणि यश मिळेल, तर मूलांक 4 ला कामाचं कौतुक आणि परदेशातून फायदा होऊ शकतो. मूलांक 5 ला मालमत्तेच्या व्यवहारात यश मिळेल आणि मूलांक 6 ला नवीन गाडी किंवा घर घेण्याचे योग आहेत. सर्व मूलांकासाठी मार्च महिन्याचा पहिला दिवस कसा असेल याविषयी ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले 1 ते 9 मूलांकाचे दैनिक अंकशास्त्र जाणून घेऊया.
आज कुटुंब आणि मित्रपरिवाराकडून तुम्हाला खूप आनंद मिळेल. तुमचं मन समाधानी असेल आणि कामात मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. नशिबाची साथ लाभेल, पण आरोग्याकडे थोडं लक्ष द्या, कामाचा जास्त ताण घेऊ नका. प्रेमसंबंधांच्या बाबतीत मात्र मनावर ताबा ठेवा, चुकीच्या आकर्षणापासून दूर राहिलेलं बरं.
लकी नंबर: 18, लकी कलर: लाल
मूलांक 2 (कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक)
advertisement
जर गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसतील तर हार मानू नका, पुन्हा प्रयत्न करा. आज ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हाल. तुमचे विरोधक आज सक्रिय असतील, पण तुम्ही तुमच्या चातुर्याने त्यांना शांत करू शकाल. खर्च वाढणार आहेत आणि त्यामानाने येणारा पैसा कमी असेल. नात्यातलं प्रेम कुठे हरवलंय असं तुम्हाला वाटू शकतं, पण कोणताही घाईत निर्णय घेऊ नका.
advertisement
लकी नंबर: 7, लकी कलर: चांदीसारखा (सिल्व्हर)
मूलांक 3 (कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेले लोक)
आज तुमचा कल अध्यात्माकडे वाढेल आणि एखाद्या आध्यात्मिक चळवळीचा भाग व्हावसं वाटेल. मुलांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. डोळ्यांच्या तक्रारी असल्यास डॉक्टरांकडे जाण्यास उशीर करू नका. आज खर्चाचा आकडा वाढल्यामुळे तुमच्या बचतीला हात लागू शकतो. कोणाकडे तरी आकर्षित होताना विचार करा, घाईघाईत घेतलेला निर्णय तुमची प्रतिमा खराब करू शकतो.
advertisement
लकी नंबर: 3, लकी कलर: क्रीम
मूलांक 4 (कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक)
आज अखेर तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला हवं ते कौतुक मिळेल. सुख-सोयींच्या वस्तू घेण्याची इच्छा आज तीव्र असेल. नवीन कार घेण्याचा विचार असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. परदेशी कंपन्यांशी व्यवहार करत असाल तर नफा मिळण्याचे चांगले योग आहेत. तुमच्या जोडीदाराची तब्येत थोडी नरम-गरम असू शकते, त्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करा.
advertisement
लकी नंबर: 9, लकी कलर: सोनेरी तपकिरी (गोल्डन ब्राऊन)
मूलांक 5 (कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला जन्मलेले लोक)
आज तुम्हाला अशा ठिकाणाहून शाबासकी मिळेल जिथून तुम्हाला अपेक्षाही नसेल. एखाद्या परिस्थितीत तुम्ही आज अडकल्यासारखं वाटू शकतं, पण डोकं शांत ठेवा. मालमत्ता खरेदीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. व्यवसायासाठी नवीन रणनीती आखताना तुम्हाला अनेक पर्यायांचा विचार करावा लागेल. आयुष्यात एखाद्या नवीन प्रेमाची चाहूल लागण्याची शक्यता आहे.
advertisement
लकी नंबर: 3, लकी कलर: कॉफी
मूलांक 6 (कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक)
आज तुमच्या अंतर्मनाचा आवाज ओळखून निर्णय घेण्याची संधी मिळेल. बाहेर जेवायला जाण्याचा बेत आखला जाऊ शकतो. नवीन घर किंवा गाडी खरेदी करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. घरगुती खर्च वाढले तरी उत्पन्नाचे नवीन मार्ग समोर येतील, त्यामुळे चिंता करू नका. आपल्या नात्यासाठी थोडा वेळ आणि मेहनत घेण्याची गरज आहे.
advertisement
लकी नंबर: 15, लकी कलर: लाल
मूलांक 7 (कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेले लोक)
आज घरातील रखडलेली कामं किंवा नळ दुरुस्तीसारखी कामं पूर्ण करा, ती पुढे ढकलणं महागात पडेल. चैनीच्या वस्तूंकडे ओढा वाढेल. जे लोक तुम्हाला आवडत नाहीत, ते तुमचं नुकसान करण्याची संधी शोधत आहेत, त्यामुळे सावध राहा. तुमचा एखादा छंद जोडीदाराला आवडत नसेल, तर त्यातून मार्ग काढण्यासाठी सुवर्णमध्य शोधा.
लकी नंबर: 5, लकी कलर: गडद हिरवा
मूलांक 8 (कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेले लोक)
आज तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात स्वतःला झोकून द्याल. दिवसभर थोडी चिंता किंवा अस्वस्थता जाणवू शकते. घराचे दरवाजे आणि सुरक्षा नीट तपासा, गाफील राहू नका. आज मिळणारा पैसा सहजासहजी मिळणार नाही, त्यासाठी जास्तीची मेहनत घ्यावी लागेल. एखाद्या औपचारिक कार्यक्रमात तुमची कोणा खास व्यक्तीशी भेट होऊ शकते.
लकी नंबर: 8, लकी कलर: पोपटी हिरवा
मूलांक 9 (कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले लोक)
एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये आज अडथळे येऊ शकतात. घरातील वस्तूंच्या खरेदीमुळे तुमचं मन आज प्रसन्न होईल. आज कष्टापेक्षा नशिबाची साथ तुम्हाला जास्त मिळेल. व्यवसायातल्या स्पर्धकांना मागे टाकण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रयत्न कराल. मन थोडं अस्वस्थ असेल, ज्यामुळे विनाकारण जोडीदाराशी भांडण होऊ शकतं. आधी विचार करा आणि मगच बोला.
लकी नंबर: 22, लकी कलर: गडद राखाडी
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 8:01 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: त्रास आमच्या पाचवीलाच..! या 3 मूलांकाचे आयुष्य अनपेक्षित पालटणार; आशा सोडलेली पण..






