Currency : भारताच्या रुपयापेक्षा इस्रायलचं चलन किती पटीने मोठं? 50 रुपयात किती इस्त्रायली शेकेल मिळतील?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जेव्हा दोन देशांचे नेते हस्तांदोलन करतात, तेव्हा केवळ मैत्रीच नाही तर दोन्ही देशांची आर्थिक ताकदही मोजली जाते. अशातच भारतीयांना एक प्रश्न सतावत आहे. क्षेत्रफळाने लहान असलेल्या इस्रायलचा एक रुपया (चलन) भारताच्या किती रुपयांच्या बरोबर आहे? इस्रायलचं चलन इतकं मजबूत कसं? चला, या आर्थिक समीकरणाचा उलगडा करूया.
जेव्हा आपण परदेश प्रवासाचं स्वप्न पाहतो किंवा आंतरराष्ट्रीय बातम्या वाचतो, तेव्हा डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे 'डॉलर'. पण सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच देशाच्या चलनाची चर्चा रंगली आहे, तो देश म्हणजे इस्रायल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्रायलच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून, तिथल्या राष्ट्राध्यक्षांशी त्यांच्या महत्त्वाच्या बैठका होत आहेत.
advertisement
जेव्हा दोन देशांचे नेते हस्तांदोलन करतात, तेव्हा केवळ मैत्रीच नाही तर दोन्ही देशांची आर्थिक ताकदही मोजली जाते. अशातच भारतीयांना एक प्रश्न सतावत आहे. क्षेत्रफळाने लहान असलेल्या इस्रायलचा एक रुपया (चलन) भारताच्या किती रुपयांच्या बरोबर आहे? इस्रायलचं चलन इतकं मजबूत कसं? चला, या आर्थिक समीकरणाचा उलगडा करूया.
advertisement
advertisement
आजचा विनिमय दर (28 फेब्रुवारी 2026)इस्रायलचा 1 शेकेल म्हणजे भारताचे सुमारे 29.23 रुपये.याचाच अर्थ, इस्रायलचं चलन भारतीय रुपयाच्या तुलनेत बरंच शक्तिशाली आहे. जर तुम्ही इस्रायलमध्ये फिरायला गेलात, तर तुम्हाला तिथल्या एका नाण्यामागे भारताचे जवळजवळ 30 रुपये खर्च करावे लागतील.50 भारतीय रुपये = 1.71 शेकेल1000 भारतीय रुपये = 34.41 शेकेल
advertisement
इस्रायलसारखा छोटा देश इतका श्रीमंत कसा?इस्रायलची लोकसंख्या आणि आकार भारताच्या तुलनेत खूपच लहान आहे, तरीही त्यांचं चलन 'शेकेल' जगातील स्थिर चलनांपैकी एक मानलं जातं. याची मुख्य कारणं खालीलप्रमाणे आहेत.इस्रायलची अर्थव्यवस्था पूर्णपणे हाय-टेक तंत्रज्ञानावर उभी आहे. सायबर सुरक्षा, संरक्षण क्षेत्र (Defense), स्टार्टअप्स आणि कृषी क्षेत्रातील आधुनिक प्रयोग (उदा. ठिबक सिंचन) यात इस्रायल जगाचा बाप मानला जातो.ज्या देशात महागाई कमी आणि स्थिर असते, त्या देशाच्या चलनाची खरेदीशक्ती टिकून राहते. इस्रायलची 'बँक ऑफ इस्रायल' महागाईवर अत्यंत कडक नियंत्रण ठेवते.जगभरातील मोठ्या कंपन्या इस्रायलच्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करतात, ज्यामुळे त्यांच्याकडे परकीय चलनासाठा मोठा आहे.
advertisement
पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात संरक्षण, जलव्यवस्थापन आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या करारांवर शिक्कामोर्तब होत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोदींना आपला 'घनिष्ठ मित्र' मानलं आहे. विशेष म्हणजे, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या गाझाच्या पुनर्निर्माणाबाबत चर्चा करत असताना भारत तिथे 'निरीक्षक' (Observer) म्हणून भूमिका बजावत आहे. ही भारताची वाढती राजनैतिक ताकद दर्शवते.
advertisement
रुपया आणि शेकेल: कोण अधिक शक्तिशाली?केवळ चलनाचा दर जास्त आहे म्हणजे ती अर्थव्यवस्था मोठी आहे असं नसतं. भारताची अर्थव्यवस्था (GDP) इस्रायलपेक्षा कैक पटीने मोठी आहे. भारत ही जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. शेकेल मजबूत असण्याचं मुख्य कारण त्यांची 'स्थिरता' आणि 'कमी लोकसंख्या' हे आहे.भारतीय पर्यकांसाठी इस्रायलची सहल सध्या महागडी ठरू शकते, कारण तिथलं जेवण, हॉटेल आणि स्थानिक सेवा यांचं रुपयातील मूल्य बरंच जास्त भरतं.









