वाह! ह्याला म्हणतात नशीब, नवीन वर्षाचा पहिलाच दिवस या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, घरात आनंद, पैसा येणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक पंचांगानुसार आज 1 जानेवारी 2026, गुरुवारचा दिवस असून नव्या वर्षाची औपचारिक सुरुवात झाली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्रह-नक्षत्रांची रचना विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
मुंबई : वैदिक पंचांगानुसार आज 1 जानेवारी 2026, गुरुवारचा दिवस असून नव्या वर्षाची औपचारिक सुरुवात झाली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्रह-नक्षत्रांची रचना विशेष महत्त्वाची मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज ग्रहांचा एक दुर्मिळ संयोग तयार होत असून त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर कमी-अधिक प्रमाणात दिसून येणार आहे. विशेषतः दत्तगुरूंच्या कृपेने अनेकांसाठी हा दिवस नवी सुरुवात, संधी आणि आत्मपरीक्षणाचा ठरण्याची शक्यता आहे. आजचा दिवस कोणासाठी लाभदायक ठरेल, तर कोणासाठी संयम आणि शहाणपणाची परीक्षा घेणारा ठरू शकतो. जाणून घेऊया नववर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य.
advertisement
मेष रास
मेष राशीच्या व्यक्तींनी आज कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेताना घाई टाळावी. भावनिक न होता व्यवहार्य दृष्टिकोन ठेवला तर गैरसमज टाळता येतील. नव्या वर्षाची सुरुवात संयमाने केल्यास पुढील काळात लाभ होईल.
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय राहण्याचा आहे. आपली मते ठामपणे मांडण्याची संधी मिळेल. लोकांचा पाठिंबा मिळण्याचीही शक्यता असून आत्मविश्वास वाढेल.
advertisement
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांना आज अपेक्षेप्रमाणे यश मिळेलच असे नाही. प्रत्येक निर्णयात योग्य नियोजन आणि व्यावहारिक विचार आवश्यक आहे. संयम ठेवल्यास अपयशाचे रूपांतर अनुभवात होईल.
कर्क रास
कर्क राशीच्या व्यक्ती सहसा खुशामत करत नाहीत, मात्र आज एखाद्या कामात स्वतःचा फायदा पाहण्याची प्रवृत्ती दिसू शकते. योग्य मर्यादा पाळल्यास कोणालाही दुखावणार नाही.
advertisement
सिंह रास
सिंह राशीसाठी आज इतरांकडून काम करून घेण्याचा दिवस आहे. नेतृत्वगुण उपयोगी पडतील. महिलांनी कोणत्याही वादात तटस्थ भूमिका ठेवणे हिताचे ठरेल.
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांना आज अति स्वातंत्र्यप्रिय स्वभावामुळे काही नाती ताणली जाऊ शकतात. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केल्यास दिवस अधिक सुरळीत जाईल.
advertisement
तूळ रास
तूळ राशीच्या व्यक्ती आज स्वतःच्या मतावर ठाम राहतील, मात्र त्यामुळे जवळच्या लोकांचे मत ऐकून घेण्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. संवाद वाढवणे गरजेचे आहे.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनी आज आत्मविश्वास वाढवण्यासाठी ध्यानधारणा किंवा आत्मचिंतन करावे. मानसिक स्थैर्य मिळाल्यास निर्णय अधिक योग्य ठरतील.
advertisement
धनु रास
धनु राशीच्या लोकांसाठी व्यवसायात स्पर्धा वाढलेली दिसेल. मात्र त्यातूनच नव्या कल्पना सुचतील आणि यशाचा मार्ग मोकळा होईल.
मकर रास
मकर राशीच्या लोकांना नोकरीत नव्या प्रकारच्या प्रशिक्षणाची संधी मिळू शकते. महिलांना कला, सर्जनशीलतेकडे लक्ष देण्याची प्रेरणा मिळेल.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांचे आज नियोजन थोडे ढासळू शकते. वेळेचे व्यवस्थापन सुधारल्यास कामे वेळेत पूर्ण होतील.
advertisement
मीन रास
मीन राशीच्या लोकांकडून घरातील ज्येष्ठ व्यक्तींना मोठ्या अपेक्षा असतील. त्या पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि घरात समाधानाचे वातावरण राहील.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 7:08 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
वाह! ह्याला म्हणतात नशीब, नवीन वर्षाचा पहिलाच दिवस या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, घरात आनंद, पैसा येणार









