Weather Alert: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी वारं फिरलं, कुठं पाऊस तर कुठं थंडीची लाट, हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात उत्तरेतून शीतलहरींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. 1 जानेवारीचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. काही ठिकाणी पाऊस बरसणार असून बहुतांश भागात थंडीचा कडाका वाढणार आहे. उत्तर दिशेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील वातावरण कोरडे आणि थंड राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 1 जानेवारी 2026 रोजी राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता नाही. किमान तापमान सरासरीपेक्षा 2 ते 4 अंश सेल्सिअसने कमी राहणार आहे. पहाटेच्या वेळी काही ठिकाणी हलके धुके दिसू शकते, तर आकाश स्वच्छ आणि काही ठिकाणी अंशतः ढगाळ राहील.
advertisement
मुंबईकरांना नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी हवामानात मोठे बदल पाहायला मिळाला. आज पहाटेच पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांनी तारांबळ उडाली. ठाणे आणि नवी मुंबई परिसरात नववर्षाच्या स्वागताला कोरडे पण आल्हाददायक थंड हवामान अनुभवायला मिळणार आहे. या भागांत किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून, कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. समुद्रकिनारी भागात रात्री गारवा जाणवेल, तर सकाळच्या वेळी सौम्य थंडी राहील.
advertisement
पुणे शहर आणि त्याच्या ग्रामीण परिसरात थंडीचा प्रभाव अधिक तीव्र राहण्याचा अंदाज आहे. येथे किमान तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरण्याची शक्यता असून, काही ग्रामीण भागांत तापमान 10 अंशांच्या आसपास नोंदवले जाऊ शकते. कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस राहील. सकाळच्या वेळेत धुक्याची स्थिती राहू शकते, तर संध्याकाळी गार वाऱ्यांमुळे थंडावा अधिक जाणवेल.
advertisement
मराठवाडा आणि विदर्भ या अंतर्गत भागांत थंडीचा कडाका कायम राहणार आहे. मराठवाड्यात किमान तापमान 10 ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर विदर्भात थंडी अधिक तीव्र असून किमान तापमान 8 ते 12 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. नागपूर, गोंदिया, चंद्रपूरसारख्या भागांत पहाटे गारठा आणि काही ठिकाणी हलके धुके दिसू शकते. कमाल तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे.
advertisement










