नववर्षाचं पहिलं सरप्राईज, मुंबईत पावसाची धुव्वादार बॅटींग, मुंबईकरांची उडाली तारांबळ

Last Updated:

Mumbai Rain Update: आज २०२६ या वर्षाचा पहिला दिवस आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना वरुणराजानं पहिलं सरप्राईज दिलं आहे. गुरुवारी पहाटेपासून मुंबईतील अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

News18
News18
आज २०२६ या वर्षाचा पहिला दिवस आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना वरुणराजानं पहिलं सरप्राईज दिलं आहे. गुरुवारी पहाटेपासून मुंबईतील अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ऐन हिवाळ्यात पाऊस पडत असल्याने भल्या सकाळी ऑफिस आणि कामावर जाणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.
हा पाऊस मुंबईकरांसह हवामानशास्त्र विभागासाठी देखील सरप्राईज देणारा ठरला आहे. कारण मुंबईत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याकडून देखील देण्यात आला नव्हता. आज पहाटे पासून दक्षिण मुंबईतील वरळी, दादर, सायन, चेंबूर ते वाशीपर्यंत अनेक ठिकाणी पावसाने धुव्वादार बॅटींग केली आहे. भल्या पहाटे पाऊस पडल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली.
advertisement
मुंबईत पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. पुढील आठवडाभर मुंबईसह अनेक ठिकाणी थंडी वाढणार आहे.
advertisement
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी एक्स अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पहाटे पाच वाजल्यापासून पावसाचे ढग जमा व्हायला सुरुवात झाली होती. मुंबईसह पालघर आणि नाशिकच्या काही भागात पावसाचे ढग दाटले आहेत. या तिन्ही जिल्ह्यात पुढील काही तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.
advertisement
कोकणात देखील काही ठिकाणी पाऊस पडल्याची माहिती आहे. या अवकाळी पाऊसाचा फटका आंबा आणि काजूच्या शेतीला बसू शकतो. सध्या आंब्याला मोहोर फुटला आहे. पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान होऊ शकतं.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
नववर्षाचं पहिलं सरप्राईज, मुंबईत पावसाची धुव्वादार बॅटींग, मुंबईकरांची उडाली तारांबळ
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement