नवरात्री उत्सव सुरू होताच या राशींचे नशीब पालटणार! पैशांची चिंता कायमची मिटणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Shardiya Navratri 2025 : पितृपक्ष संपताच संपूर्ण देशात भक्तिभावाने नवरात्री साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात नवरात्रीच्या नऊ दिवसांना विशेष महत्त्व दिले जाते.
मुंबई : पितृपक्ष संपताच संपूर्ण देशात भक्तिभावाने नवरात्री साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात नवरात्रीच्या नऊ दिवसांना विशेष महत्त्व दिले जाते. या कालावधीत देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची आराधना करून श्रद्धाळू भक्तीभावाने उपवास, पूजन आणि जप-तप करतात. यावर्षी शारदीय नवरात्री २२ सप्टेंबर २०२५ पासून २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत साजरी होणार आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून या नवरात्रीचा काळ अत्यंत विशेष मानला जात आहे. कारण यावेळी देवीच्या कृपेसोबतच शुक्र संक्रमणाचाही प्रभाव काही राशींवर अनुकूल पडणार आहे. या काळात काही राशीच्या लोकांना देवी दुर्गेचे आशीर्वाद लाभतील, ज्यामुळे त्यांचे आर्थिक संकट दूर होईल आणि जीवनात मोठी प्रगती साधता येईल.
नवरात्रीतील विशेष संयोग
ज्योतिषीय गणनेनुसार, १५ सप्टेंबर २०२५ रोजी शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहेत आणि ८ ऑक्टोबरपर्यंत या राशीत राहतील. या बदलामुळे अनेक राशींना लाभ होईल, पण काही राशींसाठी हा काळ विशेष फलदायी ठरेल. त्यांच्यावर देवी दुर्गेची विशेष कृपा राहील आणि जीवनात सकारात्मक बदल घडतील.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचा काळ अत्यंत शुभ मानला जातो. या काळात आर्थिक लाभ होईल, नवीन संधी मिळतील आणि सामाजिक आदर वाढेल. तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल. कार्यक्षेत्रात नेतृत्वाची भूमिका निभावण्याची संधी मिळेल आणि महत्त्वाचे निर्णय घेता येतील. या काळात गुरु आणि शुक्राची कृपा लाभेल, त्यामुळे प्रत्येक कामात यशाची शक्यता अधिक असेल.
advertisement
सिंह
सिंह राशीच्या जातकांसाठी नवरात्रीचा काळ सकारात्मक बदल घेऊन येईल. करिअरमध्ये प्रगती, नोकरीत बढती किंवा व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि नवीन संधी तुमच्यासमोर येतील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान राहील. तसेच धार्मिकतेत रस वाढेल, ज्यामुळे मनालाही शांती लाभेल.
तूळ
तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अध्यात्मिक उन्नतीचा आणि आर्थिक प्रगतीचा असेल. देवी दुर्गेच्या आशीर्वादामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. धार्मिक प्रवासाची संधी मिळू शकते. व्यवसायात किंवा करिअरमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा उंचावेल.
advertisement
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी शारदीय नवरात्री अत्यंत शुभ राहील. देवीच्या आशीर्वादाने आर्थिक लाभ होईल, करिअरमध्ये प्रगती मिळेल. नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. धार्मिक कार्यात आणि तीर्थयात्रेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. कुटुंबात सौख्य राहील, तर सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल.
शारदीय नवरात्रीचा हा पवित्र काळ वृषभ, सिंह, तूळ आणि धनु राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या काळात देवी दुर्गेची आराधना, उपासना आणि सेवा केल्यास जीवनात सकारात्मक ऊर्जा, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांती प्राप्त होईल. नवरात्रीत केलेले भक्तिभावाचे प्रयत्न केवळ अध्यात्मिक उन्नतीसाठीच नव्हे तर जीवनातील अडथळे दूर करून यश व समृद्धी मिळविण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहेत.
advertisement
(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 6:41 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
नवरात्री उत्सव सुरू होताच या राशींचे नशीब पालटणार! पैशांची चिंता कायमची मिटणार