Akshay Tritiya 2025: अक्षय तृतियेनिमित्त आज घरी श्रीयंत्राचा हा उपाय करा; देवी लक्ष्मी दोन्ही हातांनी करेल धनवर्षा

Last Updated:

Akshay Tritiya 2025: घरात विधीनुसार श्रीयंत्र स्थापित केले तर घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. दररोज श्रीयंत्राची पूजा आणि दर्शन केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते आणि आत्मविश्वासही वाढतो.

News18
News18
मुंबई : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या तिथीला अक्षय तृतीया म्हणतात. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. याशिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी, दान आणि सत्कर्मांनाही विशेष महत्त्व मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कामांनी अक्षय पुण्य प्राप्त होते. या पवित्र दिवशी घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर व्यक्तीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि ती नेहमी घरात राहते.
घरात विधीनुसार श्रीयंत्र स्थापित केले तर घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. दररोज श्रीयंत्राची पूजा आणि दर्शन केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते आणि आत्मविश्वासही वाढतो. पंडित रमाकांत मिश्रा यांच्या मते अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्र कसे स्थापित करायचे ते जाणून घेऊया.
श्रीयंत्राच्या स्थापनेचे नियम -
अक्षय तृतीयेला श्रीयंत्र घराच्या देव्हाऱ्यात, तिजोरीत स्थापित करावे. घरातील देव्हारा हा सर्वात पवित्र स्थान मानले जाते आणि तिजोरीत धन-संपत्ती राहते. तुम्ही श्रीयंत्र ठेवता तिथे त्या ठिकाणाची स्वच्छता आणि पवित्रता खूप महत्त्वाची मानली जाते. श्रीयंत्र अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका, यामुळे श्रीयंत्राचा प्रभाव नाहीसा होऊ शकतो.
advertisement
स्थापनेची पद्धत - सर्वात अगोदर कच्च्या दुधाने श्रीयंत्राचा अभिषेक करा. यानंतर ते गंगाजलाने चांगले धुवा. ते लाल किंवा पिवळ्या कपड्यावर ठेवा आणि वैभव लक्ष्मी मंत्र 'ओम श्रीं ह्रीं क्लीम श्रीं सिद्ध लक्ष्मीये नमः' जप करत स्थापित करा. श्रीयंत्रासमोर दिवा लावा आणि तांदूळ आणि फुले अर्पण करा. यासोबतच, दररोज त्याची पूजा करावी, श्रीयंत्र नेहमी स्वच्छ ठिकाणी स्थापित केले पाहिजे.
advertisement
श्रीयंत्राचे फायदे -
श्रीयंत्र एखाद्या व्यक्तीला आर्थिक त्रासांपासून मुक्ती मिळवून देऊ शकते. त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीला मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी देखील हे यंत्र शुभ मानले जाते. ज्या घरात श्रीयंत्र असते तिथे कधीही कौटुंबिक कलह होत नाही. अशा ठिकाणी माता लक्ष्मीची कृपा आणि समृद्धी नेहमीच राहते.
advertisement
घरात श्रीयंत्र स्थापित केले असेल तर त्याची नियमित पूजा केल्याने व्यक्तीला जीवनातील दुःखांपासून मुक्तता मिळते आणि मानसिक शांती देखील मिळते. ज्या घरात श्रीयंत्र स्थापित केले जाते, त्या कुटुंबातील लोकांच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतात. घरी नियमितपणे श्रीयंत्राची पूजा केली तर तुमच्या कार्यक्षेत्रात आणि व्यवसायात वाढ होते. तसेच, आयुष्यात येणाऱ्या त्रासांपासून तुम्हाला दिलासा मिळतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Akshay Tritiya 2025: अक्षय तृतियेनिमित्त आज घरी श्रीयंत्राचा हा उपाय करा; देवी लक्ष्मी दोन्ही हातांनी करेल धनवर्षा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement