advertisement

Chandra Grahan 2026: मुंबईसह महाराष्ट्रात चंद्रग्रहण दिसणार; चंद्रोदय संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी झाल्याबरोबर..

Last Updated:

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहण नेमकं कधी आहे, कुठे दिसेल कुठे नाही, होळी-धूलिवंदनच्या विधींवर काय परिणाम होणार असे अनेक प्रश्न निर्माण झालेले. सोमवारी, 2 मार्च रोजी होळी प्रज्वलित झाल्यानंतर ग्रहणामुळे धार्मिक विधी किंवा पुढील दिवसाच्या...

News18
News18
मुंबई :  वर्षात साधारणपणे 12 पौर्णिमा येतात आणि त्या प्रत्येकीचे स्वतःचे वेगळे महत्त्व असते. मार्च महिन्यात फाल्गुन पौर्णिमा आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी पेटवली जाते आणि दुसऱ्या दिवशी धूलिवंदन साजरे होते. हिंदू धर्मातील प्रमुख सण 'होळी'मुळे या पौर्णिमेचे महत्त्व वाढतेच, पण या वर्षीची फाल्गुन पौर्णिमा अजून एका कारणामुळे खास आहे आणि ते म्हणजे या दिवशी लागणारे चंद्रग्रहण.
चंद्रग्रहण नेमकं कधी आहे, कुठे दिसेल कुठे नाही, होळी-धूलिवंदनच्या विधींवर काय परिणाम होणार असे अनेक प्रश्न निर्माण झालेले. सोमवारी, 2 मार्च रोजी होळी प्रज्वलित झाल्यानंतर ग्रहणामुळे धार्मिक विधी किंवा पुढील दिवसाच्या नियोजनावर काही परिणाम होईल का, असे प्रश्न विचारले जात होते. या पार्श्वभूमीवर, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे.
advertisement
चंद्रग्रहणाची वेळ आणि कालावधी - दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चंद्रग्रहण एक नैसर्गिक खगोलीय आविष्कार असून ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे. मुंबईमध्ये सोमवारी संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी चंद्रोदय होईल. विशेष म्हणजे, या ग्रहणाचा काळ अत्यंत अल्प म्हणजे अवघ्या तीन मिनिटांचा असणार आहे. तीन मिनिटेच ते आपल्याला दिसू शकते. त्यासाठी स्वच्छ हवेची गरज आहे.
advertisement
होळी आणि धार्मिक नियोजनावर परिणाम नाही - सोमवारी, 2 मार्च रोजी होळी पेटवल्यानंतर मंगळवारी येणाऱ्या ग्रहणाबाबत सोमण यांनी स्पष्ट केले की, ग्रहण काळ अतिशय कमी असल्याने सण साजरा करण्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. ग्रहण काळ सुरू होण्यापूर्वीच अनेक नियोजित गोष्टी पूर्ण झालेल्या असतील. तसेच, ग्रहण काळातही कोणतेही निर्बंध पाळण्याची किंवा सणाच्या उत्साहात खंड पडू देण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. थोडक्यात सांगायचे तर, अवघ्या तीन मिनिटांच्या या चंद्रग्रहणामुळे होळीच्या सणात कोणताही अडथळा येणार नाही, असे दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Chandra Grahan 2026: मुंबईसह महाराष्ट्रात चंद्रग्रहण दिसणार; चंद्रोदय संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी झाल्याबरोबर..
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement