Numerology: सोमवारचा दिवस अनेक कामांसाठी लकी! थेट लाभ या मूलांकाना मिळणार
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Numerology 08 September 2025: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 08 सप्टेंबर 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सोमवारचा दिवस चांगला आहे, आज खूप ऊर्जावान वाटेल. बोलण्यात नम्रता ठेवा. अन्यथा कोणाशी तरी विनाकारण वाद होऊ शकतात. हाय ब्लड प्रेशरचा त्रास असला, तर काळजी घ्या.
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज सोमवारी आनंदी वाटेल. कारण अपेक्षेनुसार पैसे मिळतील. कुटुंबीयाच्या असभ्य वर्तनामुळे चिंता वाढेल. भाऊ आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. घरात प्रेमळपणाने वागलं पाहिजे. अन्यथा तुम्हाला त्रास होईल.
advertisement
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा सोमवार ठीक असेल. आज धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल. कुटुंबात शुभ कार्याचं नियोजन कराल. आज महादेवाच्या मंदिरात जाणं चांगलं ठरेल. आज तुम्ही प्रभावशाली ठराल. आज उपजीविकेचा अन्य काही मार्ग शोधाल आणि त्याचा विचार कराल.
advertisement
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज नशीब साथ देईल. दिवसभरात वर्तन आणि विचारांच्या साह्याने प्रभाव टाकाल. चांगल्या बातमीमुळे जीवनात आनंद येईल. आज शिस्तीत राहायला आवडेल. या बदलाचा फायदा होईल. आज कामाच्या ठिकाणी केलेलं काम पूर्णतः प्रभावी ठरेल.
advertisement
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सोमवारचा दिवस चांगला ठरेल. आज खास व्यक्तीशी संपर्क साधाल आणि ते फायद्याचं ठरेल. आज भावंडांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा द्याल. त्यातून खूप आनंद मिळेल. त्यामुळे जीवनशैलीत खूप चांगले बदल होतील.
advertisement
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
घरात कोणाशी, जोडीदाराशी वाद घालू नका. महिलांचा आदर करणं खूप महत्त्वाचं आहे. आज आवडीचे कपडे घेण्यासाठी खरेदीला जाल. आज आकर्षकपणाचा मित्रांवर प्रभाव पडेल. आज घरी सुंदर फुलझाडं लावणं नशिबाला साथ देणारं ठरेल.
advertisement
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कामात आज थोडी चिंता वाटेल. सोमवारी आज घेतलेल्या चांगल्या निर्णयांमुळे चांगले बदल होतील. आज परदेशातल्या बिझनेसबद्दलच्या काही कल्पना व्यक्त कराल. आगामी काळात त्या सिद्ध होती. आज दिवसभर कसलं तरी आजारपण त्रास देईल. आज कुटुंबीयाचे शब्द दुखावणारे ठरतील. त्यामुळे थोडं भावनिक वाटेल.
advertisement
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सोमवारी कोणताही विशेष निर्णय घेऊ नका. आज भौतिक सुखांमध्ये वाढ होईल; मात्र मानसिक त्रास खूप होईल. संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आज कामाच्या ठिकाणी सहकारी संशयाने पाहतील; मात्र तुम्हाला काही विशेष प्रभाव जाणवणार नाही.
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज रागावर पूर्ण नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा होत आलेलं काम उद्ध्वस्त होईल. आज सगळं काही स्पष्टपणे बोलण्याची सवय अनेक शत्रू तयार करील. आज काही धाडसी निर्णय घ्याल. ते आव्हानात्मक असतील; मात्र त्याचा परिणाम चांगला असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 8:02 PM IST