मिरचीचा 'तिखट' व्यवहार! रत्नागिरीत शेतकरी आणि ग्राहक हैराण, मात्र व्यापारी का होताहेत मालामाल?

Last Updated:

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामात मिरचीची लागवड फारशी होत नसल्यामुळे रत्नागिरीकर शेतकरी आणि ग्राहक दुसऱ्या जिल्ह्यांवर अवलंबून असतात...

Ratnagiri News
Ratnagiri News
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामात मिरचीची लागवड फारशी होत नसल्यामुळे रत्नागिरीकर शेतकरी आणि ग्राहक दुसऱ्या जिल्ह्यांवर अवलंबून असतात. सध्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथून रत्नागिरीच्या बाजारात मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या वाढलेल्या आवकेचा फायदा शेतकरी किंवा ग्राहकांना होताना दिसत नाहीये.
व्यापारी मालामाल, शेतकरी आणि ग्राहक हैराण
घाऊक बाजारात शेतकऱ्यांकडून मिरची 50 ते 60 रुपये प्रति किलो दराने खरेदी केली जात आहे, तर तीच मिरची किरकोळ बाजारात थेट 120 रुपये किलो दराने विकली जात आहे. म्हणजेच, दुप्पट दराने विक्री होत असून, यात शेतकरी आणि ग्राहक दोघेही होरपळत आहेत. मिरचीच्या या तिखट व्यवहारात फक्त व्यापारीच मालामाल होत आहेत.
advertisement
बाजारात कमी तिखट आणि जास्त तिखट अशा दोन प्रकारच्या मिरच्या उपलब्ध असून, त्या 30 रुपये प्रति पाव किलो दराने विकल्या जात आहेत. विशेष म्हणजे, आवक वाढली असूनही दर कमी होण्याऐवजी वाढत आहेत, यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
'उत्पादन' खर्चापेक्षा कमी दर
यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे मिरचीचे उत्पादन चांगले झाले आहे. पण जास्त पावसामुळे मिरची जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात मिरची विकावी लागत आहे. मिरचीचे उत्पादन, खत, तोडणी आणि वाहतुकीचा खर्च पाहता, शेतकऱ्यांना मिळणारा दर खूप कमी आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. एकूणच, वाढलेल्या उत्पादनामुळे मिरचीच्या दरात घसरण अपेक्षित होती, पण बाजारातील दलालांमुळे भाव वाढले असून, याचा फटका शेतकरी आणि ग्राहकांना बसत आहे.
advertisement
मराठी बातम्या/कृषी/
मिरचीचा 'तिखट' व्यवहार! रत्नागिरीत शेतकरी आणि ग्राहक हैराण, मात्र व्यापारी का होताहेत मालामाल?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement