advertisement

Vastu Tips: दाराच्या तोंडाला उलटी चप्पल म्हणजे..! घरात भांडण, अशुभ गोष्टी घडण्याला कारण ठरतं?

Last Updated:

Vastu Tips Marathi: बाहेरून आल्या आल्या दरवाजासमोरच जर जोड्यांचा पसारा किंवा उलटीपालटी चप्पल दिसली, तर कोणाचंही डोकं फिरेल. अस्ताव्यस्त घर माणसाच्या मनात चिडचिड निर्माण करतं आणि त्यातूनच मग भांडणं होतात.

News18
News18
मुंबई : घरात चप्पल उलटी दिसली की वडीलधारी माणसं लगेच ओरडतात. त्यांना वाटतं की चप्पल उलटी राहिली की घरात कटकटी होतात. खरंतर हे केवळ अंधश्रद्धेचं काम नाही. बाहेरून आल्या आल्या दरवाजासमोरच जर जोड्यांचा पसारा किंवा उलटीपालटी चप्पल दिसली, तर कोणाचंही डोकं फिरेल. अस्ताव्यस्त घर माणसाच्या मनात चिडचिड निर्माण करतं आणि त्यातूनच मग भांडणं होतात. वास्तुशास्त्र सुद्धा हेच सांगतं की घराचं प्रवेशद्वार जेवढं नीटनेटंक असेल, तेवढीच घरात चांगली ऊर्जा येईल. त्यामुळे चप्पल सरळ ठेवणं ही एक शिस्त आहे, ज्यामुळे मन प्रसन्न राहतं.
आज 17 फेब्रुवारी 2026 ला वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आहे. महत्त्वाचं म्हणजे हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये. त्यामुळे सुतक पाळण्याची किंवा मंदिरं बंद ठेवण्याची काहीच गरज नाही. तुम्ही तुमची रोजची कामं, पूजा अर्चा नेहमीसारखी करू शकता. हे ग्रहण दक्षिण आफ्रिका आणि अंटार्क्टिका सारख्या भागात दिसणार आहे, तिथेच त्याचे नियम लागू होतील.
advertisement
आजपासून पंचक सुद्धा सुरू होतंय. हे पंचक मंगळवारी सुरू होत असल्यामुळे याला अग्नी पंचक म्हणतात. शास्त्र-पुराणानुसार या दिवसात लाकूडकाम, घराचं छत टाकणं किंवा दक्षिण दिशेला प्रवास करणं टाळलं जातं. पण जर काही कामासाठी बाहेर जायचंच असेल, तर देवाला नमस्कार करून किंवा हनुमान चालीसा वाचून बाहेर पडायला हरकत नाही. या काळात भगवान शिव आणि विष्णूची उपासना करणं चांगलं मानलं जातं.
advertisement
ग्रहण जरी आपल्याकडे दिसणार नसलं, तरी अनेकांना ग्रहण सुटल्यावर घर शुद्ध करायची सवय असते. ग्रहण संपल्यावर घराची साधी साफसफाई करून, पोछा मारताना पाण्यात थोडं मीठ टाकलं की नकारात्मकता जाते असं मानतात. घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात थोडं गंगाजल शिंपडलं किंवा कापूर जाळला की वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं. अन्नामध्ये तुळशीचं पान टाकणं हे आरोग्यासाठीही चांगलं असतं कारण तुळशीत बॅक्टेरिया मारण्याची ताकद असते.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: दाराच्या तोंडाला उलटी चप्पल म्हणजे..! घरात भांडण, अशुभ गोष्टी घडण्याला कारण ठरतं?
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement