Holi Purnima 2026: होळी पौर्णिमा नेमकी कधी 2 की 3 मार्चला? चंद्रग्रहण असल्यानं 'अशा' गोष्टी करणं टाळावं
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Holi Purnima 2026: मार्चमध्ये फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण लागत आहे. पौर्णिमा तिथी 2 दिवस येत असल्याने नेमकी तारीख कोणती, याबाबत गोंधळ आहे. पंचांगानुसार, फाल्गुन पौर्णिमेला 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी सुरुवात होईल.
मुंबई : वर्षात साधारणपणे 12 पौर्णिमा येतात आणि त्या प्रत्येकीचे स्वतःचे वेगळे महत्त्व असते. मार्च महिन्यात फाल्गुन पौर्णिमा येत आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी पेटवली जाते आणि दुसऱ्या दिवशी धूलिवंदन साजरे होते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचेही मोठे महत्त्व आहे. हिंदू धर्मातील प्रमुख सण 'होळी'मुळे या पौर्णिमेचे महत्त्व वाढतेच, पण या वर्षीची फाल्गुन पौर्णिमा अजून एका कारणामुळे खास आहे आणि ते म्हणजे या दिवशी लागणारे चंद्रग्रहण.
पौर्णिमेला चंद्रग्रहण -
मार्चमध्ये फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण लागत आहे. पौर्णिमा तिथी 2 दिवस येत असल्याने नेमकी तारीख कोणती, याबाबत गोंधळ आहे. पंचांगानुसार, फाल्गुन पौर्णिमेला 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी सुरुवात होईल. तर, पौर्णिमा तिथीची सांगता 3 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी होईल. त्यामुळे 3 मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमा मानली जात आहे. या दिवशी स्नान-दानासाठी ब्रह्म मुहूर्त सकाळी 5 वाजून 19 मिनिटे ते 6 वाजून 8 मिनिटांपर्यंत असेल. अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजून 27 मिनिटे ते 1 वाजून 14 मिनिटांपर्यंत असेल. तसेच, या दिवशी चंद्रोदय सायंकाळी 6 वाजून 44 मिनिटांनी होईल.
advertisement
चंद्रग्रहणात होळी दहन कसे करावे?
3 मार्च रोजीच चंद्रग्रहण लागत असल्याने, ग्रहणाचा सूतक काळ पाळून होलिका दहन कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे 2 पर्याय समोर येत आहेत. काही लोक 2 मार्चच्या रात्रीच होळी पेटवून 4 मार्चला होळी खेळण्याचे नियोजन करत आहेत. जे लोक 3 मार्चला होळी दहन करणार आहेत, त्यांनी सायंकाळी 7 वाजल्यानंतर चंद्रग्रहण संपल्यावरच होळी पेटवावी.
advertisement
लक्ष्मी जयंती 2026 - हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी समुद्रमंथनातून धनलक्ष्मी प्रकट झाली होती. म्हणूनच या दिवशी लक्ष्मी जयंती साजरी केली जाते. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवीची विशेष पूजा-अर्चा केल्याने धन-समृद्धी वाढते. तसेच या रात्री चंद्राला अर्घ्य दिल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होण्यास मदत होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 4:12 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Holi Purnima 2026: होळी पौर्णिमा नेमकी कधी 2 की 3 मार्चला? चंद्रग्रहण असल्यानं 'अशा' गोष्टी करणं टाळावं









